मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 19 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात तर बघा सुरुवातीला अश्विन कोणालाही न सांगता निघून जात असतो तेव्हा कल्पना ताई म्हणतात अश्विन तू लवकर निघणार होतास तर सांगितलं का नाहीस रे बस नाश्ता कर अश्विन अगदी रुडलीच बोलत असतो घरच्यांशी नकोय मला त्यावर प्रतापराव म्हणतात अश्विन अरे काय रे अरे काय चाललंय तुझं हे सगळं कधी काय येतो कधी काय जातो आमच्याशी धड बोलत नाहीस आमच्याशी सोड ते मधुभाऊ ते हॉस्पिटलमध्ये त्यांची चौकशी सुद्धा करावीशी वाटली नाही तुला सासरे आहेत ना ते तुझे अश्विन आता
वळतो प्रताप रावांकडे आणि म्हणतो वाह वाह वाह बरं आठवलं तुम्हाला ते माझे सासरे आहेत लक्षात बरं राहिलं तुमच्या डॅड माझ्या बायकोला बरं विसरलात तुम्ही अरे देवा याच्या बायकोला काय कराव आता आता पुढे म्हणतो माझ्या बायकोचा साधा कोणी विचार पण करत नाहीये कल्पनात ताई म्हणतात काय म्हणायचे तुला अश्विन तिचा विचार का करायचा मी तिची आठवण काढावी अशी एक तरी चांगली गोष्ट घडली का? त्यावर अश्विन म्हणतो मम्मा अग खूप चांगल्या गोष्टी आहेत खूप आहेत तुम्हाला त्या लक्षात नसतील ठेवायच्या तर नका ठेवू मी ठेवेल ना सगळ्या गोष्टी तिच्या बाबतीत लक्षात तुम्ही बसा
मधुभाऊंची काळजी करत अश्विन असा उद्धट सारखा बोलतोय स्वतःच्याच आई वडिलांना बायकोच प्रेम ते किती बघा ना आई वडिलांनी केलेले कष्ट सुद्धा विसरले जातात असो आता पुढचा सीन बघा नागराजचा आणि या सुमनचा दाखवलाय नागराज गाड झोपेत असतोय आणि त्याला हे स्वप्न पडल बर का प्रेक्षकांनो सुमन म्हणत असते अहो उठा बाहेर पोलीस आलेत त्यांनी तुम्हाला बोलवलय नागराज घाबरतो मग ही सुमन सांगत असते त्याला अहो मधुभाऊंचा खून झालाय आणि तो खून तुम्ही केला असं सांगताय पोलीस चला अहो बाहेर चला नागराज म्हणतो नाही नाही मी नाही केला खून मग ती
सुमन म्हणते अहो पण मधुभाऊंनी स्टेटमेंट दिल मरण्या आधी ते इन्सपेक्टर साहेब सांगतायत तुम्ही त्यांच्या पाठीत त्यांच्या पाठीत सुरा उपसला पण समोरच्या काचेत त्यांना तुम्ही दिसले चला तुम्हाला पकडायला आलेत ते आता बाहेरून आवाज येतो नागराजला या किल्लेदार नागराज किल्लेदार बाहेर या तुम्हाला मरेपर्यंत सडायचं आता जेलमध्ये चला बाहेर या नागराज मोठ्याने ओडत असतो मी काही केलं नाही मी खून नाही केला मी काही केलं नाही आणि एकदम झोपेतन जागा होतो हे त्याचं वाईट स्वप्न असतं नागराज झोपेतन जागा होतो आणि विचार करायला लागतो अरे बापरे त्या मधुभाऊने खरच मला
खून करताना पाहिल असेल तर नाही नाही मग तर मधुभाऊ माझं नाव घेतीलच मी जे काम अर्धवट करून ठेवलय ते मला पूर्ण करायलाच हवं नागराज असा विचार करून मधुभाऊंना मारण्यासाठी दवाखान्यात जातो पण त्याचा तो प्लन फ्लॉपच होतो प्रतापराव इकडे अश्विनला ओरडत असतात म्हणजे हा सीन पूर्ण केलाय त्यांनी आता पुढे ते म्हणतात अश्विन अरे जावई म्हणून नाही पण तू डॉक्टर म्हणून तरी दवाखान्यात जा मधुभाऊंकडे सायली अर्जुनला धीर येईल जरा अश्विन म्हणतो मला कशाला त्यांना धीर द्यायचाय काही गरज नाहीये माझ्या बायकोला आहे का कोणी जेल मध्ये धीर
द्यायला कोणीच नाही तुम्ही ना तिच्या तबेतीची विचारपूस करता ना तिच्यासाठी दुसरा वकील शोधताय त्यावर कल्पनाताई म्हणतात दुसरा वकील म्हणजे रविराज भाऊजी आता लगेच अश्विन म्हणतो रविराज काका लढणार नाहीये तन्वीची केस आता त्याने तर तन्वीच नाव टाकलेल आहे तो तुमच्यापेक्षाही वरतड निघालाय आणि तुम्ही कोणीच ना तन्वीशी तुमचं नातं असलेलं जपत नाहीये पण मी मात्र मधुबांशी असलेलं माझं नातं जपायला हवं वा डॅड छान चाललंय तुमचं काय बोलतोय प्रेक्षकांनो हा काय वागतोय असो काही काही लोक भ्रमिष्ट झाले की असेच करतात तर आता बघा इकडे नागराजन असा पटापटा चाललेला असतो
सुमन म्हणते अहो थांबा एवढे घाई गडबडीत कुठे निघालात लगेच नागराज म्हणतो झाल गेली आडवी मला हजारदा सांगितलं तुला सुमन मी बाहेर जात असताना मला काही विचारत जाऊ नकोस माझं काम नाही झालं म्हणजे सुमन म्हणते पण तुम्हाला एवढं काय तातडीचं काम आहे बाहेर काय झालं काय लगेच नागराज म्हणतो मेडिकल इमर्जन्सी आली आहे माझ्या मित्राकडे मला जायचंय त्याच्या मदतीला आता ही सुमन म्हणत असते अहो मी काही मदत करू का डब्बा वगैरे देऊ का अहो अहो ऐका तर खरी पण नागराज तोपर्यंत बाहेरही गेलेला असतो पुन्हा अश्विनचा सीन कंटिन्यू केलाय प्रतापराव म्हणतात अरे अश्विन कोणावरही
इतकं प्रेम करू नये की त्याच्या चुका सुद्धा दिसू नये त्यावर अश्विन म्हणतो दिसतात ना डॅड सगळ्या चुका दिसतात माझ्या बायकोला झालेला पश्चाताप पण दिसतोय मला डॅड एक गोष्ट सांगतो तुम्हाला कुठल्याही माणसाला त्याची चूक सुधारायला एक संधी तर मिळालीच पाहिजे आणि ती संधी मी माझ्या बायकोला देणार आहे जाऊ द्या म्हणा तुमच्यासमोर मी काय बोलणार आहे कशासाठी बोलतोय कोणास ठाऊक पण या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला काही फरक पडणारच नाहीये ना असं बोलून हा उद्धट सारखा तिथून निघून जातो बिचारे प्रतापराव आणि या कल्पनाताई आवाज देतात पण हा चालला जातो तर
बघा आता इकडे दवाखान्यात इन्सपेक्टर आलेत सायली अर्जुनला ते विचारपूस करतात मधुभाऊंच्या खुनाबद्दल इन्सपेक्टर विचारतात पाटलांची तब्यत कशी आहे आम्हाला त्यांच्याशी बोलता येईल का आम्ही खुनाचा तपास करत आहोत अर्जुन म्हणतो मधुभाऊंना क्च्युली कोमात गेलेत इन्सपेक्टर साहेब ट्रीटमेंट चालू आहे पण शुद्ध कधी येईल ते सांगता येणार नाही मधुभाऊंना इन्सपेक्टर विचारतात हल्ला जेव्हा झाला पाटलांवर तेव्हा घरात कोण कोण होतं सायली म्हणते आम्ही जन्माष्टमीसाठी घराबाहेर होतो दहीहंडीचा उत्सव होता ना घरात आमच्या हे जे काही घडलंय ना ते घराच्या आत घडलय
इन्सपेक्टर साहेब अर्जुन म्हणतो हे सगळं ना म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा अद्वैत चांदेकरने बघितलं होतं त्यानेच आम्हाला पहिल्यांदा हे सांगितलं मग इन्सपेक्टर म्हणतात त्या अद्वैत चांदेकरचा नंबर द्या मला मी बोलेल त्याच्याशी बर अजून कोणी होतं का बाहेरचे कोणी मेंबर होते का? कोण कोण होतं घरात? मग अर्जुन सांगतो की काय झालं इन्सपेक्टर यावर्षी आमच्या ट्रस्टला 50 वर्ष पूर्ण झाले ना तर खूप लोक इन्वाईटेड होते आमच्या घरी त्यावर इन्सपेक्टर म्हणतात मग तुम्हाला कोणाला तुम्हाला कोणावर संशय आहे सायली म्हणते बाकी कोणावर नाही आमंत्रित असलेल्या
लोकांवर तर मुळीच नाही पण हा महिपत शिखरेवर आम्हाला शंका आहे आधीच तो गुंड आहे आणि त्यात तो आमच्यावरच्या रागापाय वेडापिसा झालाय इन्सपेक्टर म्हणतात ह मला पण तसंच वाटतय त्या दिवशी झालेली दगड फेक आणि तुमच्यावर झालेला हल्ला आता आजचा हा म्हणजे मधुकर पाटलांचा खून यामागे हा महिपत शिकरे असूच शकतो अर्जुन अर्जुन म्हणतो हो ना पण आपल्याकडे पुरावे नाहीयेत ना त्याच्या विरुद्ध ते आपल्याला शोधायचेत आता यांच इन्सपेक्टरशी बोलणं इन्सपेक्टरशी बोलणं सुरू असताना नागराज तिथे पोहोचलाय बर का हॉस्पिटलमध्ये आणि त्याला तिथे गेल्यावर महिपतचा फोन येतो. नागराज फोन
रिसीव्ह करतो नागराज फोन रिसीव्ह केल्या केल्या तिकडन महिपत म्हणतो काय नागराज शेठ झोपले का काय नागराज म्हणतो ए ऐक ना महिपत अरे मी जरा घराच्या बाहेर आहे मी तुझ्याशी बोलू शकत नाही सध्या मी नंतर बोलतो तुझ्याशी त्यावर महिपत म्हणतो काय नागराज शेय राव तुम्ही आमचा चांगलाच गळा दाबला नाही सुरुवातीला ऐकलं मी मधुकर पाटलाला तुम्ही भोसकलं नाही फार चांगलं वाटलं हो ऐकल्यावर लय गोड वाटलं गारगार वाटलं कानाला पण जेव्हा त्या अर्जुन सुभेदारन माझी गचांडी धरली ना आण त्याची बायको मला बोल बोल बोलली राव तेव्हा लक्षात आलं का
खाया पिया कोचने ग्लास थोडा मारा नागराज म्हणतो ए बाबा महिपत अरे तुला चढलीय तू झोपशील का जरा जाऊन थोड्या वेळ त्यावर महिपत म्हणतो अरे नागराज शेठ काय राव झोप उडाली आहे माझी एखादी बाई समोर येऊन चार गोष्टी ऐकवते ना अशी तेव्हा तिचा गळा दाबावासा वाटतो हो पण काय करणार काय करणार सध्या वातावरण गरम आहे ना राव नाही त्यात तुम्ही पण नवीन कांड करून ठेवलं म्हटल्यावर मी कसं काय त्या वकिलाच्या बायकोचा मुडदा पाडणार ना त्यावर नागराज म्हणतो बरे थांब ना महिपत नंतर बोल ना रे बाबा नंतर बोल माझ्याशी असं म्हणून तो फोन कट करून टाकतो बर का महिपत आता
स्वतःच्याच मनाशी बडबडतोय काय दिवस आलेत राव माझे पोरगी माझी झेलाते हा चिरकूट नागराज तो पण माझं काही ऐकून घेत नाहीये बदलणार मैप शेठ तुमचे दिवस बदलणार चांगले दिवस येणार असं म्हणून आता पुन्हा त्याचं त्याचं चालू करतोय खाणं पिणं व्टव् नंतर प्रतापराव आणि या कल्पनात ताईंचा सीन दाखवलाय प्रेक्षकांनो माझा आवाज पुन्हा एकदा बसलाय बर का काय झालंय माझी इम्युनिटी खूपच वीक झाली आहे मी चेक करून आले दवाखान्यात कारण या महिन्यात मला लगेच दुसऱ्यांदा सर्दी झाली आहे ना असं झालं नाही कधी आतापर्यंत जरा हेल्थ इशूज झालेत खूप मला पण असो सगळ्या टेस्ट करतीय मी आणि
एक दोन टेस्ट नॉर्मल पण आल्यात त्यामुळे डोनट वरी मी काळजी घेते स्वतःची आम्ही थोडं रेनोवेशन च काम काढलं होतं ना घरामध्ये त्यामुळे खूप दगदग झाली मागच्या दोन-तीन महिन्यात पण आता माझी तबेत ठीक आहे आणि आता सणवार आहेत ना त्यामुळे होणारच म्हणा थोडीफार दगदग चालायचंच पण आता मी माझ्या तबेतीकडे लक्ष देतीय राहत्या घरात रेनोवेशन काढलं की फार फजिती होते हो तसंच काहीतरी झालंय माझं तर बघा आता हा सीन कल्पनाताई आणि या प्रतापरावांचा दाखवलाय प्रतापराव म्हणतात कसा हा अश्विन काही ऐकत नाही आपलं लगेच आता कल्पना जाऊ द्या त्याचं काय बघायचं
आता मी पटकन नाश्ता करते ती आली तर पटकन नाश्ता करायला घ्यायची त्यावर प्रतापराव म्हणतात अगं कल्पना ती आली म्हणजे ती म्हणजे कोण ग कल्पना म्हणतात कोणी नाही आता विमलला म्हणतात ए विमल मेथीची भाजी ती चिरते ना तशीच चिर आणि तशीच कर मग विमल म्हणते तुम्ही सायली ताई बद्दल बोलताय ना मग या कल्पनाताई म्हणतात मग कोणाबद्दल बोलणार मी आणि कल्पनाताई मनाशीच बोलत असतात तिच्यासाठी चहा ठेवायला पाहिजे बाई आता हे प्रतापराव सगळी तयारी पाहतात आणि म्हणतात बघ विमल बघतेस ना नाही नाही म्हणता म्हणता सुनेची काळजी घेणं सुरू आहे बाई बघ अग अर्जुन सुद्धा रात्रभर
हॉस्पिटलमध्येच आहे बरं नाही मुळात ते दोघे घरी येणार की नाही हे माहित नाही अजून आपल्याला तरी बघ आपल्या स्वयंपाक घरात काय बनतय सुनेसाठी सासूचा हातचा चहा उत्तम आहे उत्तम आता कल्पनाताई चिडतात आणि म्हणतात उगाच हवा तो अर्थ लावू नका ती तुमची सून असेल ती माझी कोणी नाहीये पुन्हा पुन्हा जीव लावायला काही मी मूर्ख नाहीये आणि हॉस्पिटल मधल्या असलेल्या माणसांची आपण काळजी घेतो ना तशीच काळजी घेते मी माझ्यातली माणुसकी अजून जिवंत आहे असं म्हणून चिडून तिथून निघून जातात आता या इन्सपेक्टरांचा सीन पुन्हा दाखवलाय इन्सपेक्टर आता सगळी चौकशी करतात ते
इन्सपेक्टर अर्जुनला म्हणतात मला डॉक्टरांशी बोलायचंय कसल्या पद्धतीने चाकू मारला गेला वगैरे चौकशी करायची आहे इकडे इकडे सायलीला कुसुमचा फोन येतो ती कुसुमशी बोलण्यात बिझी असते नाही नग मधुभाऊंची अजूनही तब्यत बरी नाहीये वगैरे वगैरे आणि आता इकडे नागराज या सायलीच्या बोलण्याचा फायदा घेतो आणि त्या मधुभाऊंच्या केबिनमध्ये शिरतो सायली कुसुमला मधुभाऊंच्या तबेती विषयी सांगते आणि फोन ठेवून देते इकडे नागराज आता मधुभाऊ जिवंत आहे की नाही याची खात्री करतो बर का आणि आता मधुभाऊंच्या तोंडावर असलेला ऑक्सिजनचा मास्क बाजूला काढून ठेवतो मधुभाऊला
मारण्यासाठी तो तिथे आलेला आहे पण त्याचा हा प्लन फेल होतो प्रेक्षकांनो काहीतरी थरार रंगवला इथे त्याने तो ऑक्सिजन मास काढून ठेवलाय मग मधुभाऊंच ते जे तिथे इसीजी च ते मशीन असत ना ते असं सरळ रेषेत व्हायला लागतं म्हणजे मधुभाऊ जाता का काय असं वाटायला लागत अचानक आणि त्या नागराजला आता चाहल लागते सायलीची पण हे सगळं त्यांनी विधीन सेकंड दाखवलं म्हणजे सायली आल्यावर पुन्हा मधुभाऊंच्या तोंडावर तो मास जसाच्या तसा आहे असं त्यांनी दाखवलं थोडासा थरार रंगवला काही सेकंड की मधुभाऊ आता ते जातात की काय ते सगळं टन टन टन टन
वाजायला लागतं नागराज वाट बघत असतो जाय म्हाताऱ्या जाय म्हाताऱ्या इकडन सायली येत असते आता त्या हॉस्पिटलच्या केबिनमध्ये आणि आता मधुभाऊ जातात की काय आणि तेवढ्यात सायली येऊन म्हणते अरे नागराज काका तुम्ही इथे आणि मग अचानक मधुभाऊंच्या तोंडावर जो मास्क आहे ना तो आपल्याला जसाच्या तसा दिस सायली नागराज कडे बघते तर काय नागराज मधुभाऊंकडे सारखा पाहत असतो सायलीला जरा आश्चर्य वाटतं तो म्हण ती म्हणते की नागराज काका तुम्ही इथे आता नागराज लगेच म्हणतो अगं हो सायली माझा एक मित्र सिरियस होता ऍडमिट आहे दवाखान्यात याच त्याला
भेटायला आलो होतो अगं मी आणि मग कळलं मला की मधुभाऊ इथेच आहेत ऍडमिट म्हणून मग मधुभाऊंना भेटायला आलो ग मी आल्यावर तू फोनवर बोलत होतीस कोणाशी तरी म्हटलं तुला डिस्टर्ब नको करायला नर्सला विचारलं आणि डायरेक्ट इकडे आतमध्ये आलो ग काळजी वाटली जरा मधुभाऊंची फारच वाईट झालं ग सायली हे सगळं डॉक्टर काय म्हणाले ग सायली सायली म्हणते काका डॉक्टर म्हणताय की सांगता येणार नाही काही मधुभाऊ कोमात गेलेत आणि आशा आहे डॉक्टरांना की ते लवकरच शुद्धीवर येतील ते चांगला प्रतिसाद देतायत ना ट्रीटमेंटला कसे लोक असतात ना प्रेक्षकांनो पोटात एक ओठावर एक वागायचं
तिसरं तसाच हा नागराजे बघा ना त्या सायलीला म्हणतो अग देतील देतील प्रतिसाद देतील ते ट्रीटमेंटला तू काही काळजी करू नकोस बेटा माझा नंबर आहे ना तुझ्याकडे मला कळव मधुभाऊंच्या तबेती विषयी आता असं म्हणतो आणि तिथून निघून जातो असं अस दाखवतोय जसं की फार काळजीने आलाय तिथे मधुभाऊंच्या आणि आता सायली बघतच राहते त्याच्याकडे म्हणजे तिला असं वाटतं चला बाबा आपल्या मधुभाऊंच्या माणुसकीचे किती लोक आहेत आपले सासरचे किती चांगले आहेत मधुभाऊंना भेटायला आले आता कुठल्याही बाईला असंच वाटणार म्हणा तर आता असो नागराज निघून जातो बाहेर आणि आता विचार
करायला लागतो बरं झालं त्या सायलीच्या येण्याची चाहल लागली नाहीतर आज पकडलं गेलो असतो डॉक्टर म्हणतोय तसा हा म्हातारा शुद्धीवर आला तर नाही नाही नाही काही झालं तरी या म्हाताऱ्याला संपवायलाच हवं असा विचार करून आता नागराज पुन्हा पुढच्या प्लॅनिंगला लागला मंडळी तसं बघायला गेला तर आजचा एपिसोड जरा नॉर्मलच आहे काय झालय प्रेक्षकांनो आता खूप मोठा लॉस झालाय ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता पूर्णाजी आपल्याला दिसणार नाही आय होप ते दुसरी कुठलीतरी पूर्णाजी घेतील पण खरं सांगू प्रेक्षकांनो मला या विषयाची चर्चा सुद्धा करावीशी वाटे ना म्हणजे आपण पूर्णाजीच्या
जागेवर दुसरी कुठली पूर्णाजी इमॅजिन करणं आणि एक्सेप्ट करणं थोडसं अवघडच आहे नाही का बरं बघा पुढचा सीन बघा सायली म्हणत असते मधुभाऊंना बघा ना मधुभाऊ तुम्हाला भेटायला नागराज काका आले होते तुम्हाला माणसांची वर्दळ आवडते ना तुम्हाला भेटायला आले होते ते आश्रमात सुद्धा कोणाची न कोणाची येजा असतेच मधुभाऊ पण तुम्ही नसण्याने सगळ्यांच जग बदललय उठा ना मधुभाऊ उठा ना लवकर अर्जुन येतो तिथे आणि म्हणतो सायली उठतील मधुभाऊ लवकरच उठतील तू मधुभाऊंशी असच गप्पा मारत रहा तुझा आवाज त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल ते लवकर बरे होतील सायली सायली म्हणते अहो तुमच्या
तोंडात साखर पडो बरं इन्सपेक्टर सावंत बोलले का डॉक्टरांशी अर्जुन म्हणतो हो डॉक्टर सावंत बोलले इन्सपेक्टरांशी आणि करतील ते आता पुढची सगळी तपासणी सायली म्हणते अहो नागराज काका आले होते इथे अर्जुन म्हणतो नागराज काका आले होते पण त्यांच आणि मधुभाऊंच काही रिलेशन नाहीये सायली म्हणते हो ना म्हणजे मधुभाऊंचा स्वभावच असा आहे की त्यांच्याबद्दल कोणी माणुसकी चच वागत ना म्हणजे ते म्हणाले की त्यांचा मित्र आहे इथे कोणी ऍडमिट नागराज काकांचा म्हणून ते इथे आले होते तर आले मधुभाऊना भेटायला सगळ्यांच्या प्रार्थना फळायला येऊ देत आहो अर्जुन म्हणतो हो
नक्की येतील तू नको काळजी करूस आता पुढचा सीन पुन्हा कल्पना ताईंचा दाखवलाय पाहायला गेलं तर कल्पना ताईंना खूप काळजी वाटते सायलीची पण ती त्यांना एक्सेप्ट करायची नाहीये प्रतापराव त्यांना म्हणतात जाऊन कल्पना तुझ्या मनात जे चाललंय ते तू किती दिवस लपून ठेवणार आहेस कल्पनाई म्हणतात तर मी कशाला लपून ठेवू मग प्रतापराव म्हणतात सायली बद्दलच प्रेम ते लपून ठेवतेस तू अगं किती लपवतेस कल्पना अगं मधुभाऊंच जे काही झालंय ते झाल्यानंतर सायलीची काळजी जास्ती घेतेस तू अर्जुन पण आहे तिथे दवाखान्यात पण तुला सायलीचीच काळजी वाटते आता या
कल्पनाताई चिडून म्हणतात उगाच काही बोलू नका कोणी दवाखान्यात असलं तर काळजी वाटणारच ना प्रतापराव म्हणतात कोणीतरी अगं सायलीचे वडील आहेत ते त्यासाठीच तुझा जीव खालीवर होतोय तुझ्या सुनेसाठी तू अस्वस्थ होतीयस कल्पना अगं तिला तू मुलगी मानायची आणि अजूनही तू मनातन मांडतेस अगं का दाखवत नाहीयेस तू हे बोलून कल्पना ताई म्हणतात हे बघा तुम्ही जे बोलताय ना हो तसं काही नाहीये प्रतापराव म्हणतात अगं तुझ्या मनात जे आहे ते तू नेहमी स्पष्टपणे बोलून दाखवते आता तिचा राग बोलून दाखवतेस ना मग तिच्याबद्दलची माया का बोलून दाखवत
नाहीयेस बोल ना तुला जे वाटत ते कल्पनात ताई म्हणतात तुम्हाला सांगितलं ना मी खाली मी माणुसकीच्या नात्याने करते तिथे चहा जेवण पाठवणं हे सगळं मी शेजाऱ्यासाठी सुद्धा केलं असतं आता तिथे तर माझा अर्जुन पण आहे. अर्जुनही तिथे थांबलाय. मी या छोट्या छोट्या गोष्टी करणारच उगच तुमच्या पद्धतीने काही पण अर्थ लावू नका. कल्पनात ताई असं बोलतात आणि बाजूला जाऊन बसतात प्रतापराव मनात विचार करायला लागतात कल्पना अगं तुझ्यासोबत खूप संसार केलाय मी मला काय तुझ्या मनातलं कळत नाही का तू बोलून नशील दाखवत पण मला माहिती आहे तुला
सायली बद्दल फार काळजी वाटते अवघडच आहे बाबा प्रेक्षकांनो पुढे बघा आता पुढचा शेवटचा सीन तुम्ही बघत आहात कुसुमताई आलीय तिथे दवाखान्यात या मधुभाऊंना भेटायला आणि अर्जुन सायलीसाठी ती कॉफी घेऊन येते कोणी दवाखान्यात असल्यान प्रेक्षकांनो भयंकर असतो असतो हा सगळा सीन बाप रे इमॅजिन पण करवत नाही काय म्हणजे अवस्था असते पेशंटच्या नातेवायकांची त्यातन आर्थिक समस्या असेल ना तर बाप रे बाप आता आमच्या घराजवळ मोठं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये असे खेड्यापाड्यातले लोक येतात ना असे बिचारे भांबावलेले असतात काय सांगू तर बघा आता ही
कुसुम अर्जुन सायलीला चहा देते आणि म्हणते मी इथे येताना ना देवाला खडसावूनच आले मधुभाऊंना बरं कर नाहीतर तुला पाण्यातच ठेवेल मधुभाऊ बरे होईपर्यंत तच आपल्या हक्काचा आहे ना ग सायली कुसुम आता भाऊक होते बर का आणि मधुभाऊंच्या जवळ जाते मधुभाऊना म्हणते मधुभाऊ अहो उठा ना आपला बागेतला पिवळा गुलाब आहे ना त्याला छान कळी आली हो मधुभाऊ लवकर बरे व्हा मधुभाऊ नाही तर तो गुलाब रुसेल ना हो तुमच्यावर असं म्हणून आता कुसुम त्यांच्या डोक्याला ना अंगारा लावते ती लवकर बरे व्हावेत म्हणून आता सायली जवळ येते आणि सायलीला म्हणते झाला का बेटा चहा पिऊन हे बघ मी
काय म्हणते सायली तुम्ही दोघं ना आता आता घरी जा तुमची खूप धावपळ झाली आहे रात्रभर जागरण झाली आहे अगं तुम्ही जा आता घरी आराम करा सायली म्हणते कुसुमताई तू मुलं काका काकू सगळेच रात्रभर जागे होतात ना ही कुसुम म्हणते अग सायली आम्ही रात्रभर निदान घरी तरी होतो तुमच्या दोघांची किती धावपळ झाली इथे तुम्ही जा दोघेजण मग आता अर्जुन म्हणतो पण कुसुम ताई तुम्ही एकट्याच आहात इथे आता कुसुम म्हणते नाही साधन ताई येणार आहे इथे माझ्या सोबतीला आम्ही दोघी इथल बघून घेऊ तुम्ही जा दोघां आराम करा घरी जाऊन अर्जुन म्हणतो सायली
कुसुमताई बरोबर बोलतात आपण घरी जाऊ आराम करू थोड्या वेळ फ्रेश होऊन परत येऊ मग कुसुम ताईंना घरी जाता येईल मग आता लगेच सायली म्हणते बरं कुसुमताई इथे ना नर्स बसलेले असतात शेजारी तुला काही वाटलं ना तर त्यांना हाक मार मी घरी गेले ना की तुला डब्बा पाठवते ह कुसुम म्हणते सायली नको नग आता दगदग करू माझं काय ते मी बघून घेईल बरं तू जा घरी आणि थोडा आराम कर अर्जुन म्हणतो बरं येतो हा कुसुम ताई आणि आता सायली कुसुमला अशी मिठी मारते आणि आता निरोप घेते कुसुमचा आणि इथेच एपिसोड समाप्त होतो आता पुढच्या प्रोमोमध्ये त्यांनी छान दाखवलय प्रेक्षकांनो आता
अर्जुनला चुटपुट लागली आहे सायलीचे आईबाबा नेमके कोण आहेत याचा शोध तो आता घ्यायला निघणार आहे त्यामुळे तो सगळ्यात आधी तर कुसुमला विचारतो की सायलीचा एखादा लहानपणीचा फोटो आहे का तुमच्याकडे आता कुसुमला प्रश्न पडलाय की हा मध्येच काय बोलतोय हे सगळं ती जरा टेन्शन मध्ये येते आणि म्हणते काय हो काय झालंय कुसुम घाबरून जाते आणि म्हणते अहो तुम्ही असं का विचारताय अचानक अर्जुन सर काय झालं मला भीती वाटते आता मग अर्जुन तिला सांगतो कुसुमला सगळं की मला असं कळलंय की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत आणि इकडे प्रतापराव सायलीला समजवतात रडायचं नाही कारण ती घरी
गेल्यावर खूप रडत असते माझ्या मधुभाऊंच कसं होईल काय होईल ते असे तिथे हॉस्पिटलच्या तिथे झोपलेलेत काहीच बोलत नाहीत खूप काळजी वाटते अस्मिता पण तिला दिलासा देत असते तेव्हा प्रतापराव म्हणतात की हे बघ सायली तुझी रूम सोडली तर हे सगळं घर म्हणजे तुझं माहेर आहे मी तुला सांगितलय ना त्यामुळे काळजी करायची नाही आणि मधुभाऊ लवकर बरे होतील आणि अर्जुन पण तिला समजवतोय असं त्यांनी पुढच्या सीनमध्ये दाखवलय प्रेक्षकांनो आतापर्यंत आपण ठरलं तर मग या मालिकेचे चांगले चांगले एपिसोड एन्जॉय केलेच आता याही एपिसोड मध्ये पूर्णाजी नाहीयेत कोणी नाहीये इथेही
त्यांना साथ देऊया सगळ्या कलाकारांची मेहनत असते एवढे एफर्ट घेतात ते सगळे आपल्यानाच चांगलं काहीतरी रिप्रेझेंट करायला मला एवढंच म्हणायचं प्रेक्षकांनो सुखात तर आपण सोबत सोबत करतोच दुःखातही सोबत करूयात ठरलं तर मग या मालिकेसाठी आणि मालिकेतल्या सगळ्या कलाकारांसाठी भेटूयात उद्या पुन्हा एकदा काय होईल ठरलं तर मग या मालिकेमध्ये हे बघण्यासाठी तोपर्यंत प्रेक्षकांनो टेक केअर धन्यवाद आणि हो मी माझी काळजी घेतीय माझ्या घराचा छोटासा होम टूर मी तुम्हाला शॉर्ट्स मध्ये वगैरे नक्की दाखवेल दिवाळीच्या वेळेला तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो भेटूयात उद्या
पुन्हा एकदा धन्यवाद