नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेचा एक प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे ज्यामध्ये पूर्णा आजी बेशुद्ध झाल्याचे खापर कल्पनाने सायलीवर फोडले आहे.
यामध्ये पाहायला मिळते की बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पूर्णा आजी जवळ सगळे सुभेदार येऊन थांबले आहेत. कल्पना आणि सायली तिच्या उषाशी बसून असतात.
तेव्हा कल्पना पूर्णा आजीच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून तिला जाग करण्याचा प्रयत्न करते तेव्हा कल्पना रागारागातच सायलीला विचारते की तू पूर्णा आईंना काही बोललीस का? तेव्हा सायली सांगते नाही आई उलट त्यांना माहितही
नव्हतं की मी खोलीत आहे. त्यामुळे हा प्रोमो पाहून अनेक प्रेक्षकांनी आता कल्पनावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
प्रियाला जेल झाली मात्र या कल्पनाला काही अक्कल आली नाही. ही कल्पना वेडी झाली आहे का तिला हॉस्पिटलमध्ये टाका. त्या बिचाऱ्या सायलीवर नुसता राग काढत असते त्या प्रियाच
एवढं मोठं सत्य समोर आलं तरी हिला काही अक्कल आली नाही ही सायलीलाच बघाव तेव्हा बोलत असते आता तरी सुधार ग बाई अशा कमेंट करत प्रेक्षक आता कल्पना या पात्रावर
टीका करत आहेत तर कल्पना या पात्राबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद