मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जीवा हा तेथे मग फुटलेला असतो म्हणून त्या काचा गोळा करत असतो तेव्हा नंदिनी म्हणते होऊ द्या राहू द्या मी करते तुम्हाला नाही जमणार हे काम तेव्हा जीवा विचारतो का बरं नाही जमणार नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते तसच जीवाच सुद्धा आहे जीवा बोलून नाही तर फक्त करून दाखवतो असा तो नंदिनीला टोमणा मारतो तेव्हा नंदिनी त्याच्याकडे पाहून गालात हसते कारण तो एकदम हुबेहुब नंदिनी सारखाच बोलू लागतो मग पुढे तो म्हणतो अगं आतापर्यंत मी फक्त पसारा करत आलोय मग आता मी सुधारण्याची सुरुवात काचा
गोळ्या करण्यापासून करतो त्यात काय एवढं त्यावरती नंदिनी म्हणते एवढे सुद्धा सुधारू नका की मला धक्का बसेल आधीच केवढे धक्के बसतात तुम्ही बघताय ना असं म्हणून ती त्याच्या हातातून आता सुपयन झाडू घेते आणि स्वतः काचा गोळा करू लागते त्यानंतर आता जीवा लगेच कचरा टाकायला डस्टबिन कडे जातो त्याला तेथे एक फोटो दिसतो आणि तो फोटो पूर्णपणे असा फाडलेला असतो त्याच वेळी आता तो म्हणतो दीपक नंदिनी विचारते अहो असा कचऱ्यामध्ये का हात घालताय तर त्या फोटोचे जेवढे तुकडे असते जीवा लगेचच गोळा करतो आणि रूममध्ये घेऊन येतो. नंदिनी
म्हणते काय चाललंय तुमचं तो म्हणतो अग दीपक त्यावेळी आता तो दरवाजा बंद करून घेतो आणि म्हणतो थांब जरा मी तुला एक गोष्ट दाखवतो असं म्हणून ते त्या फोटोची जुळवाजुळव करू लागतात त्यावेळी आता तो फोटो पूर्णपणे तो असा जोडतात आणि मग त्यानंतर नंदिनी धक्क्याने जीवाकडे बघते आणि म्हणते अहो जीवा हा तर तोच माणूस आहे ज्याने मला ना किडनॅप केलं होतं कारण त्यामध्ये सँडीचा फोटो हा स्पष्टपणे दिसत असतो त्यावरती जीवा म्हणते म्हणतो पण मला एक प्रश्न पडलाय हा फोटो आपल्या घरामध्ये आला कुठून आणि हा फोटो फाडून असे डस्टबिन मध्ये कोणी तुकडे टाकले असतील नंदिनी
तेवढ्यातच कुणीतरी आता दरवाजा ठोठावत तर पार्थ असतो त्यामुळे जीवा म्हणतो ये आतमध्ये दादा काव्या आणि पार्थ दोघेही आतमध्ये येतात तेव्हा ते दोघेही फोटोचे अल्बम सुद्धा घेऊन आलेले असतात त्यावेळी पार्थ म्हणतो जीवा अरे सगळे फोटो सापडले पण तो साथीदार काही दिसत नाही बाबा काय करू मग जीवा म्हणतो बघ तो साथीदार इथे आहे तेव्हा पार्थ आणि काव्या दोघेही तो सँडीचा फोटो पाहतात. तो दीपक बरोबर असतो. मग आता आश्चर्याने आणि अगदी धक्क्यानेच पार्थ विचारतो काय हा माणूस? मग आता नंदिनी म्हणते हाच माणूस तर त्या दीपकचा साथीदार
आहे. ज्याने दीपकच्या मदतीने मला किडनॅप केलं होतं तेव्हा पार्थ विचारतो काय आणि काव्या सुद्धा धक्क्यानेच म्हणते काय सुद्धा त्या हॉस्पिटलमधील सगळ्या गोष्टी आता आठवू लागतात की कशाप्रकारे त्या सँडीच्या बायकोला आम्ही मदत केली तेव्हा नंदिनी त्या दोघांच्याही चेहऱ्याकडे पाहते आणि विचारते काय झालं तुम्ही दोघीही अगदी धक्का लागल्यासारखं एकमेकांकडे का पाहत आहे तेव्हा जीवा सुद्धा म्हणतो हो नक्की काय झालं तेव्हा काव्या सांगते अगं ताई आम्ही दोघेही ओळखतो या माणसाला तेव्हा जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे पाहतच राहतात
तर आता पार्थ म्हणतो पालघरवरून येताना याच्याच तर बायकोला आम्ही मदत केली आणि घरी आलो तेव्हा खूप गोंधळ होता म्हणून सांगायचं राहिलं मग पुढे आता काव्य सांगू लागते याच्याबरोबर ना तुझ्या आनंद निवास मधल्या रेखाताई त्या सुद्धा सोबत होत्या आणि हा त्यांचाच भाऊ आहे पार्थ पुढे सांगतो की याचीच बायको प्रेग्नेंट होती तेव्हा पुढे घडलेला सर्व प्रसंग आता लगेचच पार्थ हा सांगू लागतो. आता पार्थने कशा प्रकारे मदत केली हे सगळं सांगितल्यानंतर नंदिनीला धक्क्यावर धक्के बसतात मग आता ती जीवाला म्हणते जीवा अहो याचच तर बाळ आहे
ना तिथे काचेच्या पेटीमध्ये आणि आपण यालाच मदत करणार होतो आत्ता आणि याच्यासाठीच आपण इथे प्रार्थना सुद्धा केली देवाजवळ आत्ताच त्यावेळी दादा हॉस्पिटलच नाव काय आहे असं जेव्हा विचारतो तेव्हा पार्थ म्हणतो सिटी हॉस्पिटल काव्या म्हणते आता हाच आपल्याला वसू आत्याच खोटं उघड पाडण्यासाठी मदत करणार आता वायटाचा अंत सुरू झालाय अस आता काव्या सर्वांना सांगते पार्थ म्हणतो की चला मी ना कपडे चेंज करून येतो अगोदर मग सगळे जण आता सिटी हॉस्पिटल मध्ये जायला निघतात दुसरीकडे रेखाताई फोनवर खूप रडत असतात बाळासाठी एबी निगेटिव्ह रक्त लागतय
असं सारखं सारखं सांगत असतात आणि जर रक्त नाही मिळालं ना तर प्लीज बाळाचा जीव धोक्यात आहे असं म्हणत असतात तुम्ही पर्सनल लेव्लवर जाऊन प्लीज कॉन्टॅक्ट करा अशी ती विनवणी करत असतात तेव्हा सँडी सुद्धा रेखा ताईच्या हातातून मोबाईल घेतो आणि म्हणतो हो ना खरच तुम्ही पर्सनल लेव्लवर चेक करा आणि कितीही पैसे लागले ना तरीही चालेल पण माझं बाळ हे वाचलं पाहिजे एबी निगेटिव्ह रक्तगट आहे त्याचा प्लीज प्लीज अशी तो रिक्वेस्ट करत असतो तेव्हा तो अक्षरशः रडू लागतो आणि म्हणतो ताई अगं कुठून काहीच होत नाहीये ग आणि हे सगळं माझ्या बाळाबरोबरच का होतय अगं ते इनमीन
दोन दिवसांच लेकरू आहे असं म्हणून तो खूप रडत असतो तेवढ्यात जीवा आनंदिनी काव्या आणि पार तेथे येऊन आता सँडीची कॉलरच पकडतात तेव्हा आता लगेचच रेखाताई नंदिनी जवळ जातात आणि तिला मिठी मारतात लतच म्हणतात नंदिनी बघ ना ग काय होऊन बसलय हे बरं झालं तू आलीस आमच्यावर ना खरंच खूप मोठं संकट आलय आता जीवा आणि नंदिनीला पाहून ऑलरेडी सँडी खूप घाबरलेला असतो रेखाताई आता सांगू लागतात हा सँडी आहे माझा भाऊ सँडीच्या बाळाची ची कंडिशन खरच खूप क्रिटिकल आहे. अरे बघ ना सँडी मी तुला बोलले होते ना बाळा ही नंदिनी आमच्या आनंद निवास मधली त्यावेळी जीवा सांगतो सँडीला
नंदिनीची ओळख करून देण्याची गरजच नाहीये. कारण हा नंदिनीला ना अगदी चांगलाच ओळख रेखाताई विचारतात असं कसं चांगलाच ओळखतो कारण सँडी तर आनंद निवास मध्ये कधीच आला नाही जीवा आता कोड्यात बोलू लागतो आणि म्हणतो याची नंदिनी बरोबर इतकीशी नाही तर वेगळीच ओळख आहे रेखा ताई म्हणतात म्हणजे मला नाही समजलं तू काय बोलतोस जीवन नंदिनी तेव्हा नंदिनी पुढे येते आणि विचारते सँडी आता तू बोलणार आहेस की मी सांगू तेव्हा सँडी म्हणतो मी कुठे काय केले अहो त्यावेळी नंदिनी रागातच विचारते अच्छा म्हणजे तुला अजूनही कबूल व्हायचं नाहीये
का? आता ठीक आहे हा मग मी स्वतः सांगते तेव्हा रेखाताई विचारते नंदिनी अगं काय सांगावं लागेल सांग ना अग तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय त्यावरती नंदिनी म्हणते रेखाताई माझ्या लग्नातन मला किडनॅप करणारा फक्त दीपकच नव्हता. त्याचा साथीदार तुमचा हा भाऊ सँडी सुद्धा होता. असं नंदिनी जेव्हा त्याच भांड बहिणीसमोर फोडते तेव्हा मात्र रेखाच्या तळपायाची आगच मस्तकात जाते. मग ती पुढे सांगू लागते या दोघांनीच मिळून मला लग्नातन किडनॅप केलं मग आता नंदिनी तू हे काय बोलतीयस असा विश्वासच आता तिला बसत नसतो त्यामुळे आता रेखाताई
तुम्हाला हे सगळं खोटं वाटतंय ना असं म्हणून पार्थ हा सँडी जवळ जातो आणि त्याला म्हणतो सँडी आता जे काही खरं आहे ना ते तूच सांग यांना अरे बोल पटकन असं म्हणून पार्थ त्याला बोलत करतो तेव्हा तूच दीपकचा साथीदार आहेस ना अस आता पार्थ विचारतो तेव्हा सँडी गडबड तो गोंधळतो आणि खूप घाबरलेला असतो त्यावेळी तो काहीही बोलत नाही हे पाहून रेखाताई पुढे जातात आणि विचारतात पण तू एवढा का घाबरला आहेस आणि तुझी अशी बोबडी तरी का वळाली आहे आणि याचा अर्थ तू दीपक सोबत मिळून नंदिनीला किडनॅप केलं होतं का असं म्हणून त्या संदेशी कानाखाली मारतात बोल ना आता असं म्हणून
त्या खूपच रागवतात त्यावेळी आता काय रे तू दीपक सोबत मिळून हे एवढं घाणेरडं कृत्य का केलं याचा जापत्या विचारू लागतात अरे का वागलास तू असा कुठून सुचली तुला ही दुर्बुद्धी बोल ना असं म्हणून त्या अक्षरशहा त्याच्या पाठीत धपाटे घालू लागतात मग नंदिनी म्हणते रेखाताई अहो थांबा नका मारू त्याला तुम्ही शांत व्हा जरा स्वतःला आवरा रेखाताई म्हणतात अगं नंदिनी कशी शांत होऊ सांग बरं तू अगं आनंद निवास मध्ये असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात तू आनंद वाटण्याच नुसतं काम केल आहे आमचे संसार सुखाचे व्हावे त्यासाठी प्रत्येक वेळी तू मदतीचा हात दिलास आणि आज
मला ला कळतय की तुझा संसार होण्या अगोदर माझ्या भावाने तुझाच संसार उद्ध्वस्त केला सांग ना असं नीच काम का केलस तू का केलस याचा जापत्या विचारू लागतात अरे आता तर मला लाज वाटायला लागली आहे की तू माझा भाऊ आहेस तेव्हा तो अक्षरशहा रडकुंडेला येतो हात जोडतो आणि म्हणतो रेखाताई प्लीज तू तरी असं बोलू नकोस ग प्लीज अगं खरंच माझा ना खूप नाईलाज होता ग मला पैशांची खूप गरज होती कारण माझ्या बायकोला ना पाचवा महिना सुरू झाला होता आणि सोनोग्राफीसाठी खूप पैसे लागणार होते आणि म्हणूनच गरजेपोटी मला दीपकची साथ सुद्धा द्यावी लागली
तुम्ही मला खरच खरच माफ करा अशी हात जोडून तो सर्वांना विनंती करतो मग आता तो हात जोडून जेव्हा तळमळीने अगदी कळकळीची विनंती करतो तेव्हा मात्र काव्या पुढे येते आणि म्हणते हे बघ आता सँडी सँडी तू दीपक बरोबर मिळून जे काही केल आहेस त्यामुळे आमची आयुष्य खरोखर उद्वस्त झाली आहे पण आता जे झालंय ना ते मी नाही बदलू शकत पण तू केलेलं चुकीचं च प्रायश्चित्त करण्याची एक संधी तर आम्ही नक्कीच तुला देऊ शकतो तेव्हा आता संधी म्हणजे नक्की काय करायचे असं तो काव्याला विचारतो तेव्हा काव्या ही नंदिनीकडे पाहते मग नंदिनी तिला इशारा
करते तर काव्या म्हणते माझ्या ताईवर असणारे आरोप पुसण्यासाठी आणि तुझ्यामुळे काही लोकांना त्रास झालाय हे जन्मभराचं गिल्ट सुद्धा तू कमी करू शकतो तेव्हा ती विचारते करशील का मदत मग आता सँडी विचारतो मदत म्हणजे नक्की काय तेव्हा जीवा म्हणतो हो मदतच करायची आहे तुला तेव्हा जीवा सगळं काही आता एक्सप्लेन करून सँडीला सांगत असतो हे सगळं ऐकून आता काव्या आणि नंदिनीला खूप त्रास होऊ लागतो त्यानंतर पार्थ म्हणतो हे बघ सँडी तू एकटा नाही आहेस आम्ही आहोत सर्वजण तुझ्याबरोबर आणि तू एकमेव असा आहेस जो वसु आत्या आणि दीपकच्या विरोधात साक्ष देऊ शकतोस आता मला
सांग आमची साथ तू देशील का मग लगेचच आता सँडीला आठवतं की कशाप्रकारे दीपकने धमकी दिली म्हणजे जर मुंबई मधून गायब नाही झालास तर तुला बाप म्हणायला अजिबात तुझं बाळ ठेवणार नाही अशी धमकी त्या दीपकने दिलेली असते आणि म्हणूनच सँडी जरा घाबरतो आणि म्हणतो नाही नाही मी कुणाला साथ वगैरे देऊ शकत नाही आणि कुणा विरोधात साक्ष सुद्धा तेव्हा असं म्हणून तो पुन्हा एकदा हात झटकतो आपल्या बाळासाठी जीवा रागात विचारतो काय रे तू काय बोलतोस हे मग आता सँडी म्हणतो तुम्ही काहीही सांगा मी नाही ऐकणार मग आता पारत्याची कॉलरस पकडतो आणि
म्हणतो इतका वेळ तुला शांततेत सांगतोय तुला कळत नाही का आणि माझ्यासमोर ना दुसरी पद्धत सुद्धा आहे घरच्यांसमोर कसं खरं खोटं करायचं नाही तर आता पोलीस कोठडी आहेच आता बोल पटकन काय करायचं तेव्हा सँडी म्हणतो हे पहा तुम्ही माझ्याबरोबर अशी बळजबरी नाही करू शकत हा तेव्हा पार्थ म्हणतो मी काय करू शकतो ना हे तुला नाही माहित असं म्हणून तो सँडीला आता खूप म्हणजे खूपच हॉस्पिटलमध्ये मारतो तेव्हा आता जीवाचा सुद्धा पारा रा चढतो आणि तो सुद्धा सँडीला जबरदस्त असा मारतो लाथा बुक्यांनी अक्षरशहा सँडीला खूप तिथे हे दोघेही भाऊ मिळून मारतात तेव्हा नंदिनी
रेखाताई त्याचबरोबर काव्या त्या तिघांनाही बाजूला करण्याचा प्रयत्न करत असते त्यांची भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असते परंतु पार्थच्या मनामध्ये आता तेवढा रागच असतो सँडी विषयीचा तेव्हा कसबस नंदिनी पार्थला बाजूला करते मग काव्या त्याच्यावर ओरडते काय चाललंय तुमचं ही सिचुएशन खूप पेशन्सली हँडल करण्याची आहे. तेव्हा आता पार्थ म्हणतो करा तुम्हाला काय करायचंय ना ते करा आता असं म्हणून तो अजूनच चिडतो. तेव्हा नंदिनी हात जोडून सँडीला म्हणते अरे तुला त्रास द्यायला किंवा तुझ्यावर कोणती जबरदस्ती करायला आम्ही आलेलोच
नाहीये पण तू जरा समजून घे प्लीज फक्त आणि फक्त माझ्या स्वाभिमानासाठी अरे एकदा का जर घरच्यांनी माझा स्वाभिमान दुखावला ना तर मला असं नजर वर करून सुद्धा बघता येणार नाही त्यामुळे प्लीज मी रिक्वेस्ट करते सँडी तुला अरे तू रेखाताईंचा भाऊ आहेस ना मी खरच तुला काहीही म्हणजे काहीही होऊ देणार नाही मी शपथ घेऊन सांगते मग आता सँडी रडकुंडीला येतो आणि म्हणतो मी हात जोडतो प्लीज मला यामध्ये ओडू नका अगोदरच मी खूप टेन्शन मध्ये आहे अहो माझं बाळ पेटीत आहे त्याच्या जीवाला धोका आहे हे पहा मला कशातच अडकायचं नाहीये प्लीज मग
त्याच वेळी आता डॉक्टर तेथे येतात आणि म्हणतात हे पहा सँडी सर तुमच्या बाळाची तब्यत खूप बिघडली आहे आणि ब्लड तर अजूनही मिळालेलं नाहीये पण सॉरी हा कधी काय होईल सांगू शकत नाही तेव्हा सगळेजण आता खूपच घाबरतात की आता काय करायच तेव्हा रेखाताई पुढे येतात आणि म्हणतात प्लीज डॉक्टर असं नका बोलू हो प्लीज अहो बाळाला वाचवण्याचे प्रयत्न तुम्ही थांबवू नका मग सँडी सुद्धा आता रडत असतो आणि म्हणतो डॉक्टर मी तुमच्या पाया पडतो पण प्लीज प्लीज असं करू नका तुम्ही माझ्या बाळाला वाचवा मी वाटेल ते करायला तयार आहे रक्त आणण्यासाठी पण
मला प्लीज थोडा वेळ द्या प्लीज तेव्हा डॉक्टर म्हणतात प्लीज कंट्रोल युअरसेल्फ मी डॉक्टर आहे देव नाहीये अहो आम्ही सगळे प्रयत्न केले परंतु एबी निगेटिव्ह ब्लड ब्लड ग्रुप कुठेच मिळत नाहीये काय करू आम्ही तरी कारण हा ब्लड ग्रुप ना खरच खूप रेअर आहे त्यामुळे बाळ वाचेल असं असं म्हटल्याबरोबर डॉक्टर थांबतात तेव्हा नंदिनी म्हणते नक्कीच वाचेल का नाही वाचणार मग आता सँडी कडे पाहात नंदिनी लगेचच पुढे येते आणि डॉक्टरांना विचारते की तुम्हाला एबी निगेटिव्ह रक्त हवय ना मग बाळाला काही होणार नाही तेव्हा माझा ब्लड ग्रुप सुद्धा एबी निगेटिव्ह आहे मी बाळाला
ब्लड नक्कीच देऊ शकते तेव्हा पार्थ हळू काव्याकडे बघतो तर काव्या हो असं म्हणते मग सँडीच्या बाळासाठी लगेचच नंदिनी आता रक्त देण्यासाठी तयार होते आणि हे सगळं पाहून सँडी तर अगदी खालीच पाहतो त्याला अगदी शरम वाटू लागते स्वतःचे तेव्हा डॉक्टर खुश होतात आणि म्हणतात बरं ठीक आहे चला नंदिनी जायला निघते तेवढ्यातच जीवा आता म्हणतो की ये नंदिनी काय करतेस तू अगं ज्या माणसाने तुझी मदत करण्यासाठी अगदी स्पष्टपणे नकार दिला तू त्याचीच मदत करतीयेस तेव्हा नंदिनी म्हणते हो कारण माझ्यातला माणूस पण ना अजून जिवंत आहे जीवा आणि मदतीचा हात हे बघत नाही की आपण
कुणाला मदत करतो शेवटी अडलेल्या बाईला आणि नडलेल्या माणसाला कायमच मदत करावी हे माझं तत्व आहे तेव्हा लगेचच आता सँडी हा नंदिनीकडे पाहू लागतो आणि खूप इमोशनल होतो जीवा आणि पारतला मात्र खूप राग आलेला असतो कारण आता नंदिनीच्या बाबतीत एवढं सगळं घडून देखील नंदिनी एवढं काही या सँडीच्या बाळासाठी करतीये तरीही सँडीला काही फरक पडत नाही आणि रेखाताई सुद्धा खूप रागात सँडी कडे पाहू लागतात शेवटी नंदिनी आता लगेचच डॉक्टरांबरोबर ब्लड डोनेट करण्यासाठी जाते तेव्हा सगळे जण अगदी कौतुकाने तिच्याकडे बघत असतात तर सँडी हा एकदम शॉक मध्ये जातो की आपण मदत करत नाही
परंतु ही नंदिनी खरच खूप धीराची आहे आणि अगदी शांततेत माझ्या बाळाला ला ती रक्त सुद्धा द्यायला गेली आणि आज तिच्यामुळेच माझ्या बाळाचा जीव सुद्धा वाचणार आहे मग त्यानंतर रेखाताई सँडीला अशा झाप झाप झापतात आणि म्हणतात की काय रे सँडी तू बघतोस ना काय चाललं इथे ते अरे तू ज्या मुलीचा आयुष्य उद्ध्वस्त केलस ज्या मुलीच्या स्वप्नांवर पाणी टाकलस तीच मुलगी तुझ्या बाळाच आयुष्य वाचवण्यासाठी इथे आलीय अरे आता तरी त्यांना मदत कर तेव्हा सँडी विचारतो अगं पण त्यावेळी रेखाताई रागात म्हणते अरे पण काय अरे अशी लाज विकल्यासारखं काय वागतोयस तू मला कळत नाही
आणि जर तू माझं ऐकणार नसशील ना तर मी स्वतः तुला पोलिसांमध्ये देईन अशी धमकी रेखाताई स्वतःच्या भावाला देतात मग त्यानंतर काव्या ही रेख ताईंना शांत करते आणि म्हणते हे बघ सँडी माझ्या नंदिनी ताईने तुला मदत केली म्हणून तू सुद्धा मला मदत कर असं मी अजिबात म्हणणार नाही पण माझी बहीण सुद्धा तुझीच बहीण आहे असं समजून कर ना आम्हाला मदत प्लीज अरे अरे आमची नंदिनी ताई म्हणजे आमचा जीव आहे रे सासर आणि माहेर अगदी दोन्हीही आनंदाने सांभाळते अरे आमचं लग्न झाल्यापासन माझ्या सासू सासऱ्यांना मी काका आणि काकू अशी हाक मारत असते पण माझी नंदिनी ताई त्यांना
आईबाबा अशीच हाक मारते आणि नुसती हाक मारत नाही ती त्या दोघांनाही आईबाबा मानते तेव्हा पार्थ आणि जीवा दोघेही सँडीकडे बघत असतात मग पुढे काव्या सांगू लागते आज त्याच सासऱ्यांनी तिला बजावून सांगितलय की इथून पुढे बाबा अशी हाक मला अजिबात मारायची नाही. मग माझ्या त्या नंदिनी ताईने काय करायचं सांग बरं तूच आणि ज्या आईसारख्या सासूबाई आहेत बाबांनी त्याच सासूबाईंच्या रूममध्ये बंदी सुद्धा घातली माझ्या नंदिनी ताईला जाण्यासाठी हे बघ सँडी तुझी ताई तुझ्या बाळासाठी झडतीय ना तशी आमची ताई आमच्यासाठी खरच खूप झडतीय रे असं म्हणून काव्या खूप रडत असते तेव्हा
जीवाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं आणि तो कशीबशी आपले अश्रू पुसतो काव्या पुढे सांगते खूप केलय रे सँडी तिने आमच्यासाठी अरे तिच्या च्या बोलण्यामुळे ना कधीच समोरच्या माणसाचं मन दुखवलं जात नाही प्रयत्नात ती नेहमी असते अरे तू सुद्धा विचार करत नाही तशी ती वागत असते आणि तिच्यामधले गुण ती अमलात आणते अरे तू ताईला किडनॅप केल्यामुळे खूप विचित्र परिस्थितीचा आम्ही सर्वांनी सामना केलाय आम्ही लग्न करून देशमुखांच्या घरी गेलो तेव्हापासन मी खूप वेळा देशमुखांच्या घरातल वातावरण बिघडवलय आणि तेच बिघडवलेलं वातावरण नंदिनी ताईने सावरलय अरे तिला
सुद्धा या सगळ्या गोष्टी चा खूप त्रास झालाय पण अगदी शांतपणे तिने सगळं हँडल केलं कुणाला बोलून नाही दाखवला तिला होणारा त्रास तिने अरे आतल्या आत रडत राहिली कुडत राहिली सगळं काही आतल्या आत अगदी दाबून ठेवलं तिने पण एकदाही तिच्या ओठातून तक्रारीचा सूर नव्हताच अरे खरंच खूप गुणी आणि चांगली आहे माझी नंदिनी ताई आणि अशा चांगल्या माणसांबरोबर नेहमी चांगलंच घडावं असं वाटत नाही का रे तुला सँडी अरे दीपकच्या सांगण्यावरन तू नंदिनी ताईला किडनॅप केलं तुझा नाईलाज होता आम्ही हे समजू शकतो पण आता तीच एक गोष्ट ती तुझी चूक रिपेअर करण्याची एक संधी आम्ही तुला
देतोय ना सँडी अरे तू आम्हाला मदत केल्यामुळे तिचा सगळा खोटेपणा खरेपणामध्ये बदलणार आहे रे आणि आमच्या ताईला खरं सिद्ध करण्यासाठी आम्हाला तुझ्या मदतीची खरच खूप गरज आहे रे असं आता जेव्हा ती हात जोडून सँडीला म्हणते तेव्हा मात्र सँडी अजूनही आपली नजर फिरवत असतो. पार्थाने जीवाला वाटत असतं की सँडी आत्ता मदत करेल आणि आता म्हणेल की मी मदत करायला तयार आहे परंतु सँडी दीपकच्या दबावाखाली असतो. तर आता काव्य अजूनच रडते हात जोडते आणि म्हणते सँडी प्लीज माझ्या ताईसाठी मी तुझ्यासमोर हात जोडतेय तिचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी
रे फक्त मग सँडी आपली नजर फिरवतो दुसरीकडे नंदिनी आता लगेचच आपलं ब्लड हे डोनेट करू लागते तिलाही त्रासच होत असतो पण त्या लहान लेकरासाठी सगळा त्रास ती विसरून गेलेली असते कारण आपल्यामुळे कुणाला तरी जीवदान मिळणार हीच भावना फक्त तिच्या मनात असते इकडे काव्या रडत असते त्यामुळे पार्थ तिला शांत करतो त्यानंतर आता जीवा हा सँडी जवळ जातो आणि म्हणतो तू नंदिनीला किडनॅप केलं आणि मी तिला वाचवलं आणि मग त्यानंतर तिचं लग्न केव्हाच पार पडलं होतं तिचं लग्न ठरल्याप्रमाणे झालंच नाही अरे सँडी अरे उलट जे नव्हतं ठरलं ना तेच घडलं त्या लग्न मंडपामध्ये कारण
नंदिनीच लग्न ना माझ्याशी झालं आणि लग्नानंतर आमच आयुष्य उद्धवस्त झालं म्हणून सगळेजण आम्ही जगावर राग काढत राहिलो आणि आता नंदिनी हेच माझं जग आहे असं म्हणत सगळं काही हसत मुखाने स्वीकारलं सुद्धा माझ्या अगोदर नंदिनीनेच आणि हातावर मिळालेल्या प्रसादासारखं तिने गोड मानून सगळं काही घेतलं आणि आतापर्यंत सगळ्यांच फक्त आणि फक्त चांगलंच केलंय तिने तिने कुणाचही वाईट केलं नाही आणि कुणाबद्दल असा वाईट विचार सुद्धा केला नाही आणि या वाईट जगात अजूनही तिचा चांगुलपणावर विश्वास आहे आणि म्हणूनच त्या दीपकवर विश्वास ठेवून ती
त्या भामट्याला घरी घेऊन आली होती आणि मग नंतर स्वतः चक्रव्यूहात अडकली हे बघ आता तू तिला असं नाही म्हणू शकत कारण तूच आमची शेवटची आशा आहेस कारण तू जर घरी येऊन सगळं काही कबूल केलस ना तरच आणि तरच सगळं काही नीट होईल असं म्हणून सगळेजण त्याला रिक्वेस्ट करू लागतात तेव्हा सँडी अजूनही घाबरलेलाच असतो कारण बाळाच्या जीवावर दीपक उठणार तर नाही ना याची काळजी त्याच्या चेहऱ्यावर असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये वसू ही नाटकी करत आता देवासमोर येते आणि विक्रमला ला म्हणते की विक्रम अरे मी बांधलेली राखी ही सैल झाली की बाळा
तेव्हा नंदिनी जीवा काव्या पार तेथे येतात नंदिनी रागातच विचारते काय हो खोटेपणाच्या धाग्यामध्ये असं तुम्ही अजून किती दिवस गुंडाळून ठेवणार हो बाबांना मग आता वसून नाटकी करू लागते आणि पुन्हा म्हणू लागते की अगं जे काही खरं असेल ना ते पुन्हा एकदा बोल बाई तुला बोलायचं तेवढं बोल आणि संपवून टाक हे सगळं त्यावेळी आता खरं काय आहे ना हेच सांगायला आम्ही सगळेजण इथे उभे आहोत असं नंदिनी म्हणते. तेवढ्यात सँडीची एंट्री होते सँडीला पाहून आता इकडे वसू आणि रम्याच्या पायाखालची मात्र जमीनच सरकते तर आता मित्रांनो अशाच मालिकेचे
पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.