मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात कालचा भाग प्रदर्शितच झाला नाही काल रविवारची सुट्टी होती ठरलं तर मग या मालिकेला सुद्धा आणि मला सुद्धा काल त्यांनी रिपीट टेलकास्ट दाखवला प्रेक्षकांनो कोट सीनचा मधुभाऊ जेव्हा सुटले ना तेव्हा काय काय झालं होतं ते सगळं त्यांनी काल एक दीड तास काहीतरी दाखवलं चार वाजता होता तो एपिसोड तर असो तर आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आजचा एपिसोड सॉलिड आहे हा छान दाखवला सुरुवातीला आपण बघतोय कल्प कल्पना ताईंनी सायलीच ताट वाढलय आणि तिला म्हणतात जेऊन
घे उगी चूक नाहीये तर शिक्षा कशाला भोगायची जेऊन घे असं म्हणून त्या आता निघून जातात अर्जुन आणि प्रतापराव भलतेच खुश झालेत त्यांची आयडिया वर्क झाली आहे कल्पनाताई आता सायलीची माया करू लागल्यात आता या कल्पनाताई गेल्यावर प्रतिमा आत्या म्हणतात जेवशील की नाही सायली अगं बघ तुझ्या सासूने अस्मिताच्या विरोधात तुझी बाजू घेतली आहे तुझी काहीही चूक नाही असं म्हणाली तुझी सासू चल बाई तुला तिचा मान ठेवावाच लागेल ह बस जेवायला प्रतिमा आता सायलीला आग्रहाने जेवायला बसवतात आता या कल्पनाताई जात असतात त्यांच्या खोलीमध्ये
तेव्हा वरून म्हणजे जिन्यावरून बघत असतात सायली जेवते की नाही आणि सायली जेव्हा एक घास घेते तेव्हाच या कल्पनाताई त्यांच्या रूममध्ये जातात बर का म्हणजे पोटात माया तर आहे पण ती ओठावर कबूल करायची नाही हे कल्पना ताईंना असो पण आता अर्जुन आणि प्रतापराव प्रयत्न करतायत त्यामुळे बघूयात काय काय होतय साई यलीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले मंडळी ठरलं तर मग या मालिकेचे आज 900 भाग पूर्ण होतात ठरलं तर मग या मालिकेचे आणि मालिकेतल्या कलाकारांचे खूप खूप अभिनंदन असच प्रेक्षकांना भरभरून आनंद आणि करमणूक त्यांनी द्यावी हीच काय ती
आपल्या प्रेक्षकांची अपेक्षा तर बघा सायली खूप खुश होते कल्पनाताई स्वतः तिला जेव असं म्हणतात म्हणून आणि आनंदाने जेवते प्रतिमा त्या तिच जेवण होतो तिच्या जवळ बसल्यात पुढच्या सीनमध्ये सायलीने कुसुमला फोन केलाय कुसुम म्हणते हो बोल ग सायली सायली म्हणते कुसुमताई हॉस्पिटललाच आहेस ना ग कुसुमताई कुसुम म्हणते हो अग जरा बाहेर येऊन बसले होते ते मधुभाऊ जवळ बसूनही काय उपयोग आहे ना सायली म्हणते म्हणजे मधुभाऊंच्या तबेतीत सुधारणा नाही का ग झाली आता तिकडन कुसुम म्हणते अगं पण डॉक्टर म्हणाले चांगल्या खुणात दिसतायत म्हणजे आपले मधुभाऊ कधीही जागे होऊ शकतील
त्यावर सायली म्हणते हो आपण प्रार्थना करूयात देवाजवळ कुसुमताई मी येऊ का तिकडे त्यावर कुसू म्हणते अग नको नको तू कशाला दगद करते सायली काका काकू आहेत गौरव आहे साधना आहेत अग आहोत सगळे इथे थांबतोयत आम्ही काही मधुभाऊंना एकट नाही सोडत ग सायली म्हणते हो अग कुसुमताई मला माहिती आहे तुम्ही सगळे आहातच पण थोड्या वेळ येऊ दे ना मला तिकडे अगं मी ना मधुभाऊंना एकट सोडायचं नाही असं ठरवलय म्हणजे मधुभाऊंना एकदा तरी भेटायचं मी येईल हा थोड्या वेळाने असं म्हणून ही फोन ठेवून देते तेवढ्यात अर्जुन येतो सायलीच्या माग सायलीला विचारतो काय म्हणताय कुसुम ताई
सायली म्हणते कुसुमताई सांगते की मधुभाऊंच्या तबेतीच्या चांगल्या खुणा आहेत माझी खात्री आहे अहो मधुभाऊ लवकर बरे होणार देवी आई माझं सगळं ऐकेल आणि मधुभाऊ लवकरच घरी येतील पण काय हो मधुभाऊ बरे झाल्यावर त्यांना इथे आणता येईल का हो परत अर्जुन म्हणतो असं का विचारतेस सायली म्हणते नाही अस्मिता ताई जर पुन्हा काही बोलल्या तर नाही म्हणजे मधुभाऊंच्या समोर बाबा माझ्यावर चिडले तर अर्जुन म्हणतो अस्मिताईच बोल कुठे मनाला लावून घेतेस सवयच आहे तिची बोलायची आणि प्रेग्नन्सी मध्ये मूड स्विंग्स होतात ना बोलतच राहते ती तू सोड ग तिला नको लक्ष देऊ तिच्याकडे
आता सायली म्हणते नाही अहो अस्मिता ताईच समजलं पण बाबांचं काय हो बाबा जर चिडले ना माझ्यावर तर मला नाही हो सहन होत मला खूपच वाईट वाटतं अर्जुन म्हणतो बर नो प्रॉब्लेम मी बोलतो डॅडशी सायली म्हणते आणि शिवाय आता लगेच अर्जुन म्हणतो शिवाय काय सायली म्हणते अहो म्हणजे शिवाय बाबांच्या चिडण्यामुळे आज चांगली गोष्ट घडली आहे अर्जुन म्हणतो कुठली गोष्ट सायली म्हणते अहो आईनी आज स्वतःून मला जेवायला वाढलं आणि म्हणाल्या की जे झालं त्यात माझी चूक नव्हती तुम्हाला माहितीय मी जेवायला सुरुवात करेपर्यंत आई तिथेच उभ्या होत्या
त्या थांबल्या होत्या वर जिन्यावर मला खूप दिवसांनी आईंच हे रूप बघायला मिळतय अगदी पूर्वीसारखं अर्जुन आता मनातल्या मनात म्हणतो ही तर सुरुवात आहे बायको माझा माझा प्लॅन वर्क होतोय याची खूण आहे आता प्लॅन मम्मा सुरूच राहणार आहे सायली खुश असते बिचारी म्हणजे वाटातून चांगलं होतं ते असं प्रेक्षकांनो आता बाप्पाचा आगमन दोनच दिवसावर आलाय कोणाकोणाची तयारी झाली आहे मला काल सुट्टी मिळाली ना एवढा आनंद झाला बघा खूप दिवसांनी सुट्टी मिळाली ना थोड्या वेळ मस्त पडले सकाळी उशिरा उठले आणि सगळी तयारी करून घेतली जवळपास ऑलमोस्ट सगळी
तयारी झाली आहे वेळेवर करायची तयारीच राहिली आहे कोणाकोणाची तयारी पूर्ण झाली आहे मला नक्की नक्की कमेंट मध्ये सांगा तर असो सायलीबाई एकदम खुशम खुश झाल्यात कारण त्यांच्या सासूबाई त्यांच्यावरती जरा कमी नाराज आहेत तर असो आता पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय की कल्पना ताई आता झोपत असतात रात्री आता प्रतापराव जरा गुगली घेतात बर का त्यांची म्हणजे मजा घेतात आता प्रतापराव म्हणतात काय ग कल्पना अगं मी काय म्हणत होतो की तुला काही बोलायचं आहे का या कल्पनाताई म्हणतात कशाबद्दल हो त्यावर प्रतापराव म्हणतात कशाबद्दल काय अग
त्या सायली बद्दल कशी वागायली आजकाल सायली आतापर्यंत अस्मिताची चांगली काळजी घ्यायची पण आता लक्ष उडाल तिचं आणि तू तिची बाजू का घेतलीस ग कल्पना मला आवडलं नाही बर का ते अजिबात आता या कल्पनाताई चिडतात त्यांच्यावर आणि म्हणतात हे बघा मी काय तिची बाजूबिजू घेत नाही हा अस्मिताच्या चुकाही मी काय पाठीशी घालणार नाहीयेत कशी वागते आपली अस्मिता आजकाल सतत आपली चिडचिड चिडचिड टोमणे गर्भारपणात मुलींनी आनंदी राहायला हवं इच आपलं भलतच काहीतरी चालत असतं प्रेक्षकांनो म्हणतात ना सीधी उंगली से घीनही निकलता तो उंगली तेढी करण चाहिये
अर्जुन आणि प्रतापरावांनी ही आयडिया छान काढली मला आवडली म्हणजे मुद्दाम कल्पनात ताईं समोर रागराग करायचा सायलीचा आपसूकच त्या सायलीची बाजू घेतात आता असं म्हटल्यावर प्रतापराव म्हणतात अगं मग काय झालं कल्पना सायलीची पण काहीतरी जबाबदारी आहे ना अगं सून ये ती या घरची अस्मिताची वहिनी आहे तरी पण ती अशी वागते नाही नाही अस्मिताच्या बाबतीत मी गलथारपणा खपवून घेणार नाही आता कल्पनाताईंना तो राग बर का त्या प्रतापरावांना नेहमी सवय ना सायलीची बाजू घ्यायची आणि आता ते एकदम सायलीच्या विरुद्धच बोलतात कल्पनाताई चिडतात आणि
म्हणतात तुमचा हल्ली सुरज बदललाय प्रतापराव म्हणतात म्हणजे असं का बोलतेस कल्पना कल्पनाताई म्हणतात नाही अस्मिताच्या चोरओटीला काय बोलला होता तो तुम्ही ठामपणे बोलला होतात मी सायलीचा बाप आहे काही झालं तरी मी सायलीच्या पाठीशी उभ राहणारच बोलले होते ना तुम्ही प्रतापराव आता गडबडतात बर का आणि म्हणतात अगं हा बोललो होतो मी पण कस आहे कल्पना त्या दिवशी सायलीने तेल ओतलं नाही याची खात्री होती मला पण अशी चूक होत राहिली सायली कडन तर मी ती सहन करायची का आता कल्पनात ताई पुन्हा एकदा सायलीला म्हणजे एक्सप्लेन करायला जातात सायलीची बाजू घ्यायला जातात
हो पण तरी आपल्या अस्मिताच चुकलं ना हो लगेच प्रतापराव म्हणतात जाऊदे जाऊ दे कशाला वात घालते ते झोप आता आता लगेच कल्पनात ताई चिडतात आणि म्हणतात हा तुमचं बोलून झालं ना बरोबर आहे मग लगेच विषय बंद करणारच तुम्ही नेहमीच झाले बाई तुमचं असं म्हणून चिडचिड करतात आणि झोपी जातात पण आता प्रतापराव गालातल्या गालात हसताय बर का की आपली आयडियाच चांगलं काम करते चला म्हटलं ना मगाशी वायटातून काहीतरी चांगलं होतय पुढे बघा पुढच्या सीन मध्ये प्रिया मस्त सकाळी उशिरा उठली आहे ताणून झोपलेली आहे ती खूप दिवसांनंतर तिला गादीवरझोप
पायला मिळाला दवाखान्यात ऍडमिट झाल्यात ना प्रिया मॅडम आता एक कॉन्स्टेबल पण आहे बर का तिच्यावर लक्ष ठेवायला तिथे ही मस्त उठते सकाळी उशिरा आणि विचार करते वा किती दिवसानंतर अशा मोमो गादीवर झोपायला भेटलय हा काय मस्त झोप लागली आज त्यावर आता अश्विन येतो बरं का तिथे बघा मी म्हटलं ना प्रेक्सनो परवा चांगलं वागलं ना कोणाशी की लोक मूर्ख समजतात तो अश्विन म्हणतो गुड मॉर्निंग प्रिया विचार करते यार हा चिपकू अजून इथेच आहे का यार त्या ग्लू बनवणाऱ्या कंपनीने याला बघितलं ना तर जाहिरातीत वापरतील याला आता ही लगेच अशी म्हणते
अश्विन आलास का रे आता बघा म्हणजे मनात एक आणि ओठावर प्रेमाने बोलायची कमाल आहे नाही आता तो अश्विन तिला म्हणतो उठ अग तन्वी उठ आता लगेच अत्यावस्था अवस्थेत उठती बर का आणि म्हणते अरे अश्विन तू अरे तू अजूनही इथेच आहेस तू का नाही गेलास घरी रात्री अश्विन म्हणतो अग तन्वी तुला एकटीला सोडून कस जाणार होतो मी बरं जाऊ दे तुला तुला कसं वाटतय आता कालच्यापेक्षा बेटर वाटतंय ना आता प्रिया म्हणते हो अरे बेटर आहे पण थोडा अशक्तपणा वाटतोय मला अश्विन म्हणतो हो अगं जाईल अशक्तपणा लवकर पण तू कॉफी घे बरं तन्वी कॉफी घे म्हणजे तुला बरं वाटेल
प्रिया म्हणते अश्विन तू नसतास तर माझं काय झालं असतं रे मी मी जेलमध्ये चक्कर येऊन पडले कोणाला काहीच पडलेली नव्हती तेव्हाच मी पडला पडल्या मेले असते तर बरं झालं असतं किती नौटंकी आहे बघा प्रेक्षकांनो आता आज अश्विनचे भांडण सुद्धा दाखवलेत बर का पुढे बघत रहा काय काय तमाशा झालाय आता अश्विन म्हणतो असं नाही बोलायचं तन्वी मी आहे ना चल कॉफी पिऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल आता मी तुझ्यासाठी थोड्या वेळाने घरचा डब्बा आणतो. प्रिया म्हणते घरचं जेवण अरे अश्विन कित्येक दिवसात मला घरच जेवण नाही रे मिळालं मी मी तुझी यायची वाट बघेन अश्विन
म्हणतो हो येतो हा मी लवकर तू कॉफी पी तोपर्यंत आता अश्विनने हिला सांगितलं तर घरी पण ती सायली काही हिला डब्बा देत नाही बर का आणि रविराज पण तिथेच असतात पण भारी लागवला तो सीन बघा आता काय होतं सगळेजण घरात खूप आनंदी असतात अश्विन निघून जातो तिथून ही आपली मस्त आरामात प्रिया कॉफी पितीय प्रतापराव कल्पनाताई ताई यायच्या आत या प्रतिमात्याला म्हणतात ए प्रतिमा अगो आपला प्लान परफेक्ट वर्क होतोय बर का मस्त अगं काल रात्री कल्पनाने मलाच चार गोष्टी सुनवल्या बघ मलाच म्हणाली की सायली सोबत तुमचा बोलायचा सूर बदललाय वगैरे
प्रतिमात्या म्हणतात चला प्रगती आहे तर आपल्या प्लॅनमध्ये पण हे सगळं लवकर संपायला हवं प्रताप आता लगेच अस्मिता म्हणते अगं प्रतिमात्या काही होणार नाही मम्मा सायलीची उघडपणे बाजू घेईपर्यंत आपला प्लॅन आपण चालू ठेवू म्हणजे बघ लवकरच सगळं नीट होईल आता तेवढ्यात सायली येते बरं का मग यांचं बोलणं ते बंद करतात आता सायली आल्या आल्या अस्मिता नॉर्मल बोलते आधी तिच्याशी सायली काय ग अश्विन कुठे सकाळपासन दिसलं नाही सायली म्हणते अहो अस्मिता ताई अहो आपल्या अश्विन भाऊजी काल रात्रीपासन घरी आलेले नाहीयेत आता ती ऐकल्यावर जरा टेन्शनच आलय घरच्यांना सायली
पुढे म्हणते हे सारखे फोन करत होते पण अश्विन भाऊजीनी यांचा फोन उचललाच प्रतापराव म्हणतात हा पोरगा ना बायकोपाई वेड्यासारखं वागायला लागलाय आता त्या प्रतिमाच्या समोरच बोलतात ते सगळं त्यांना जरा कानकुंड होतं आता पुढे प्रतापराव म्हणतात हा त्या बायकोपाई त्या पेशंटची काळजी घेतो की नाही कोणास टोक स्वतःचा सायली म्हणते ते फक्त प्रियाला सोडवायचा विचार करताय सध्या आता या प्रतिमांना कसं तरी होतं बर का प्रतिमा म्हणतात तन्वीवर एवढं प्रेम करणारा नवरा मिळालाय पण तिला काही त्याची किंमत नाहीये ती कशाचीच किंमत ठेवत नाही प्रतिमात्यांना असं खूप वाईट
वाटत असतं पण आता तेवढ्यात रविराज काका आलेत सायली म्हणते रविराज काका या ना या आता या रविराजांनी प्रतिमात्याचे कपडे आणि औषध आणलेत बर का सगळे खुश झालेत अस्मिता म्हणते अरे वा काका अरे कालपासन तुझीच आठवण काढत होतो आम्ही रविराज काका म्हणतात अग अस्मिता तू आठवण काढलीस आणि मी हाजर झालो बघ सायली म्हणते रविराज काका तुम्ही कॉफी घेणार का का नाश्ताच करणार मला चालेल एक कप कॉफी असो विचारलं सायलीने म्हणून उत्तर दिलं तर रविराज म्हणतात अगं सायली मला काही नको आहे सध्या अगं प्रतिमाचे कपडे आणि औषध घेऊन आलोय तिचा अचानकच बेट
ठरला ना इथे राहण्याचा प्रतापराव म्हणतात अरे रविराज चांगले महिनाभराचे कपडे आणलेस की नाही माहेरी आली आहे बर का माझी बहीण आता काय तिला आम्ही महिनाभर सोडत नसतो. रविराज म्हणतात हो माझी काही हरकत नाहीय मला हवं तितके दिवस राहू देत काही हरकत नाही पण सायली बेटा तुझ्यावर एक जबाबदारी सोपवणार आहे मी सायली म्हणते कुठली हो काका आता रविराजानी ते औषधांचा बॉक्स सायली जवळ नेलाय आणि ते म्हणतात हे बघ सायली ही ना प्रतिमाची औषध आहेत ही औषध प्रतिमाला वेळेवर द्यायची हे बघ हा जो डोस आहे ना आत्ताचा हा मी वरती काढून ठेवलाय
बाकीची सगळी डोसेस यात आहेत सायली म्हणते म्हणजे काय रविराज काका ही जबाबदारी मी आनंदाने पार पाडणार आता फक्त मला सांगा की कोणत्या गोळ्या कधी द्यायच्यात आता हे रविराज सायलीला समजवत असतात कुठली गोळी केव्हा द्यायची ते त्यांनी जरा म्युट दाखवलाय सीन प्रेक्षकांनो आजचा एपिसोड ऐकायला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आपण सगळेच जण आता सणावारामध्ये जरा बिझी होणार आहे मैत्रिणींनो तुमची सगळी काम साधून माझा रिव्ू अगदी शांततेत ऐकायला विसरू नका बघत रहा ठरलं तर मग आता पुढच्या सीनमध्ये अर्जुन आलाय जरा टेन्शन मध्ये
आता त्याला सायलीच्या आईबाबांचा शोध घ्यायचा आहे त्याला झालेल्या गोष्टी आठवतात अद्वैतने त्याला सांगितलं की सायलीचे आईबाबा जिवंत आहे मधुभाऊने सांगितलं त्याला हे सगळे सीन त्याला आठवतात म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा दाखवून दिलेत ते स्क्रीनवर अर्जुन विचार करतोय मम्माच मिशन तर चांगलं सुरू आहे आय होप डॅड आणि अस्मिताई मम्माला सायलीशी चांगलं वागायला लावतीलच त्याला आता सगळं आठवतय आणि तो विचार करतोय आता मी सायलीच्या खऱ्या आई वडिलांना कसं शोधू ते असतील तरी कुठे कसं शोधू कसं शोधू कळतच नाहीये कुठे शोधावं काहीही कळत नाहीये
मधुभाऊ कधी शुद्धीवर येणार तेही काही माहिती नाहीये आणि कुसुमताईला तर काहीच माहिती नाहीये मग मी कसा लीड शोधू यार आता सायलीच्या लहानपणाबद्दल मला फक्त सायली सांगू शकते आता हळूहळू अर्जुन सायलीच्या भूतकाळाकडे वळायला लागलाय अर्जुन विचार करतोय सायलीला काही आठवत आठवत असेल का तिच्या लहानपणाबद्दल काय करू मी आता सायलीला कसं विचारू कसं विचारू आता आता अर्जुनने एक प्लॅन केलाय डोक्यामध्ये थोड्या वेळ विचार करतो तो काही सेकंद आणि मग मनाशीच म्हणतो यस हे बेस्ट आहे बोलता बोलता सायली तिच्या बालपणाबद्दल नक्कीच सांगेल मला हे एक चांगलं ऑप्शन आहे चला
असं म्हणून आता तो लगेच तयारीला लागला आता तो तिला डेटवर घेऊन जाणार आहे जो आपण प्रोमो पाहिला ना 27 ऑगस्टचा आता तो आपल्याला उद्याच बघायला मिळणार आहे बर का प्रेक्षकांनो म्हणजे सायलीला तिच्या लहानपणीच्या आठवणी आठवताय पण आय होप त्यांनी या वेळेला सायली ही खरी तन्वी आहे टलिस्ट त्याच्या जवळ तरी न्याव त्या विषयाच्या कारण ते काय करतात प्रेक्षकांनो कधी कधी सायली ही खरी तन्वी आहे या विषयापर्यंत नेतात आपल्याला आणि मग पुन्हा काहीतरी विषय डायव्र्ट करून टाकतात पण यावेळेला कोणाला तरी कळावं सायली खरी तन्वी आहे एवढीच काय ती अपेक्षा आहे आता
बघा पुढच्या सीनमध्ये अश्विन घरी आलेला असतो प्रतापराव आता जरा त्याला रागवतात आधी तर ते म्हणतात अरे अश्विन ये ना घरात आता अश्विन स्वतःच्याच घरात यायला जरा भाव खातो प्रतापराव म्हणतात काय रे बाबा कुठे होतास अश्विन काल गेला होतास आजच येतोयस मग अश्विन लगेच उद्धट सारखाच बोलतो मी फ्रेश होऊन जरा बाहेर जाणार आहे माझा जेवणाचा डब्बा तयार ठेव सायली सायली म्हणते बरं हरकत नाही भाऊजी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पाठवायचा का डब्बा नाही म्हणजे गरम गरम पाठवला असता ना वेळेवर म्हणून म्हटलं लगेच अश्विन म्हणतो तो डब्बा मी स्वतःसाठी नाही घेऊन चाललो मी
तन्वीसाठी डब्बा घेऊन जातोय आता अश्विनने सांगितल्या सांगितल्या सगळ्यांचे चेहरे उतरलेत बर का तन्वीच नाव घेतल्यावर आता स्मिता म्हणते तन्वीसाठी लगेच अश्विन म्हणतो हो तुम्ही तन्वीची साधी चौकशी केली नाही तरी तुम्हाला सांगतो बरं का तन्वी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तिची तब्यत ठीक नाहीये काल जेलमध्ये चक्कर येऊन पडली तिच बीपी लो झालं होतं नशिबाने मी तिथे होतो म्हणून तिला ट्रीटमेंट मिळाली आता हे रविराज एकदम पुढे येतात बर का हॉस्पिटलमध्ये तन्वी आता त्यांना आठवतं की तिने त्यांच्याशी किती खोट नाटक बोललय आणि त्यांचा विश्वासघात केलाय सगळं कोट सीन
वगैरे रविराजान अचानक आठवतो आणि ते स्वतःची पावलं मागे घेतात म्हणजे ते जरा मोहात आलेले असतात पण ते स्वतःला सावरतात मुलीच्या प्रेमाच्या मोहात त्यावर अश्विन म्हणतो काय रे काका काहीतरी विचारत होतास ना ते पुढे काहीच बोलत नाहीत ना शांत बसतात रविराज मग अश्विन त्यांना टोमणा मारतो काय रे काका काय झालं रविराज म्हणतात काही नाही काही नाही काही नाही झालं सायली आता चिडते आणि म्हणते माफ करा अश्विन भाऊजी मी प्रियाला काही डब्बा देणार नाहीये आता सायलीने डायरेक्ट उत्तर दिल दिल अश्विनला त्यामुळे त्याचा इगो अट झालाय तो म्हणतो काय देणार नाही म्हणजे
सायली म्हणते हो सायली म्हणते प्रियाशी या घराने सगळे संबंध तोडलेत आणि जी लोक खाल्लेल्या मिठाला जागा लोकांसाठी या घरातून अन्न जाणं शक्यच नाहीये सायलीने डायरेक्ट तोंडावर नकार दिलाय अश्विनच्या त्यामुळे तो चिडतो आणि म्हणतो हे बघ सायली मी तुला विचारत नाहीये मी तुला सांगतोय की मला डब्बा हवाय तनवीसाठी प्रतिमात्या तर सायलीकडे आणि अश्विनकडे बघतच राहतात बर का आणि प्रताप राव सुद्धा अश्विन म्हणतो माझ्या बायकोसाठी मला घरच जेवण घेऊन जायचं म्हणजे जायचं आता चिडतात प्रतापराव अश्विनचा आवाज वाढल्यामुळे ते म्हणतात अश्विन मुळात हे घर तुझ्या बायकोच नाही
आता अश्विन म्हणतो का डॅड माझं नाहीये का हे घर माझं आहे ना हे घर आहे की नाही आता प्रतिमा त्या बिचारे डोळे लावून घेतात बर का हे असं भांडण त्यांना सहन नाही होतय अश्विन पुढे म्हणतो जसं माझं हे घर आहे ना तसं तन्वीच सुद्धा आहे तुम्ही कितीही नाकारा पण हे सत्य बदलणार नाहीये डॅड हा किती उद्धट सारखा बोलतोय प्रेक्षकांनो त्या बायकोसाठी ती बायकोपा काय गुणाची आहे असो आता तेवढ्यात कल्पनाताई येतात आणि म्हणतात काय हो काय झालं एवढे का आवाज वाढले सगळ्यांचे रविराज भाऊजी तुम्ही कधी आलात कल्पनाताई आल्यावर जरा रविराजांना
आणि प्रतिमात्याला अजून खिन्न वाटतं रविराज म्हणतात आत्ताच आलो वहिनी जरा उशिरा आला असतो तर बरं झालं असतं माझी मुलगी घरात नाहीये पण तरी घरच्यांमध्ये ती भांडण लावतीय हे सगळं मला बघावं तर लागलं नसतं ना उशिरा आलो उशिरा आलो असतो तर बरं झालं असतं शेवटी प्रतापराव म्हणतात ए रविराज अरे बाबा तू कशाला वाईट वाटून घेतोयस जाऊ दे आणि बाबा अश्विन तुझी बायको हॉस्पिटलमध्ये ना तुझ्या बायकोला तिथे हॉस्पिटल मधल जेवण मिळेल इथून घरून तिला काहीही मदत मिळणार नाही हे लक्षात ठेव कल्पना ताई म्हणतात अरे बापरे तन्वी हॉस्पिटलमध्ये काय झालं अश्विन म्हणतो जाऊ
दे का मम्मा त्याने काय फरक पडतोय ती उपाशी शी मेली तरी चालणार आहे हे मान्यच केलय ना तुम्ही सगळ्यांनी हरकत नाहीये मी बघून घेईल प्रतिमा आत्या म्हणतात अरे अश्विन असं कोणी म्हटलं नाही रे अश्विन म्हणतो हो ग आत्या पण कोणी तिच्यासाठी जेवण पण द्यायला तयार नाहीये ना ठीक आहे ठीक आहे अन्नपूर्णा ट्रस्ट मध्ये रस्त्यावरच्या गोरगरिबांना जेवण दिलं जातं पण दुसरीकडे स्वतःच्या घरच्या सुनेला जेवण नाकारताय तेवढ्यात आता या प्रतापरावांनी कसलं सॉलिड उत्तर दिलय बघा अश्विनला मला फार आवडलं त्यांचं उत्तर ते म्हणतात हो अश्विन कारण ते गोरगरीब खाल्लेल्या ताटात
थुंकत नाहीत. अरे तुझ्या बायकोने काय काय केलय हे मला बोलायला लावू नको. अश्विन म्हणतो ठीक आहे डॅड ठीक आहे डॅड ठीक आहे आता तुम्ही ना काहीच बोलू नका म्हणजे खरं बोलायला गेलं की ते काही सहन होत नाही बर का अश्विनला आणि अश्विन बरोबर तिथून पळ काढतो आता त्या प्रतिमा त्याला आणि रविराजांना बिचाऱ्यांना एवढं कानकोंड होतं ना की त्यांची पोरगी तिथे नसतानाही खरच भांडण लावतीय तीचा विषय निघाला की घरात वात चालू होऊन जातो आता अश्विन तानतान निघून जातो बर का डब्बा काही त्याला मिळत नाही आता लगेच रविराजांना म्हणजे खूप कसं
तरी होतं मग प्रतापराव त्यांच्या जवळ जातात आणि म्हणतात रविराज आय एम व्हेरी सॉरी रे आमच्या घरात काय काय चाललंय हे तुला बघावं लागलं सगळेच खूप खिन्न झालेत रविराज पण दुःखी होतात आणि म्हणतात खरंच रे प्रताप काही कळतच नाहीये रे मला माझ्या मुलीला एवढाच चांगला नवरा मिळाला याचा आनंद मान की तन्वीची योग्यताच नाहीये तिला एवढा चांगला नवरा मिळायची या गोष्टीच दुःख मानू आता रविराजांना त्रास होतोय हे बघून प्रतिमात्या म्हणतात अहो तुमची मनस्थिती ठीक नसेल तर आपण आता घरी जाऊया का मी पण येते तुमच्या सोबत त्यावर रविराज म्हणतात
नको ग प्रतिमा तू थांब ठरल्याप्रमाणे तू इथे मुक्कामाला रहा पण काळजी घे स्वतःची माझं मुंबईला एक काम आहे तेवढं करून मी येतोच परत असं म्हणतात ते आणि आता प्रतिमा त्याचा आणि सगळ्यांचा निरोप घेतात सगळ्यांना फार कसं तरी होतं बिचारे चहा पाणी घेताच न गेले आणि त्यांना तमाशा बघावा लागला तर असो मंडळी आजचा एपिसोड इथेच संपला रविराज निघून जातात आणि प्रतिमात्यांचा चेहरा जरा उदास होतो पुढच्या एपिसोड मध्ये म्हणजे पुढच्या भागामध्ये तुम्ही बघणार आहात अर्जुन सायलीला कुठेतरी डेटवर घेऊन गेलाय आणि तिच्या लहानपणाबद्दल तिच्याकडून तो जाणून
घेण्यासाठी उत्सुक असतो म्हणून आता तो सहज तिला उदाहरण देतो की लहान असताना तन्वी आणि मी असच खेळायचो समोर दोन छोटी मुलं असतात ती एकमेकांशी खेळत असतात मध्येच भांडत असतात सायली आता त्या लहान मुलांना बघत असते आणि तिला आता तिच्या लहानपणीचा तो पास्ट आठवायला लागतो की तीच खरी तन्वी आहे आणि ती मोठ्याने ओरडते आई करून जोरात किंचाळते ती अर्जुनला कळतच नाही हिला काय झालं मंडळी काय वाटतय सायली खरी तन्वी आहे हे सत्य इतक्या लवकर समोर येईल का? मला तरी वाटतय की इतक्यात नाही येणार पण बघू आता यातून सगळ्यातून काय निष्पन्न होतं
नेमकं कुठलंतरी सत्य बाहेर काढा म्हणावं असो मधुभाऊंनी पण अर्धवाट सत्य सांगितलं आणि कोमात चालले गेले बघा ना उगीचच सस्पेन्स क्रिएट केला म्हणजे सायलीचे आईबाबा जिवंत एवढं सांगायपेक्षा सायली खरी तनवी एवढं सांगितलं असतं तर ते पण जरा आरामात आले असते ना कोमातून बाहेर आपल्यालाही टेन्शन नसतं असो त्यांना जे दाखवायचं दाखवतात मंडळी बघूयात पुढे काय काय घडतय पण इंटरेस्टिंग ट्विस्ट आणि टर्न येणार हे खर आहे तर बघत रहा ठरलं तर बघ आणि पुन्हा एकदा ठरलं तर मग या मालिकेचे खूप खूप अभिनंदन 900 भाग पूर्ण झाल्याबद्दल भेटूयात उद्या पुन्हा एकदा
मंडळी तोपर्यंत टेक केअर धन्यवाद