जर तुमच्याकडे इवी गाडी असेल तर हा पोस्ट नक्की वाचा, कदाचित तुमचा हा पोस्टमुळे तुमचे अडचण दूर होईल. आणि तुम्हाला या पोस्ट मधून तुमचे समस्या व इतर अडचणी दूर करण्यात मदत मिळेल.
काही जणांना असं समस्या येते की इवी गाडीमध्ये बसल्यानंतर तुम्हाला अशक्त वाटत असेल आणि मळमळ करत असेल किंवा उलटी येण्यात भाग पाडत असेल तर समजून घ्यायचे कारण काय आहे आणि हा कशामुळे होत आहे.
हा जो अनुभव येत आहे हे फक्त तुम्हाला नाही किंवा भरपूर लोकांना असं समस्या येत आहे.
तर काही वैज्ञानिक लोकांना यावर लक्ष देऊन ह्याचा मार्ग आणि ह्याच कारण सांगण्याचा प्रयत्न केलेले आहेत .
मित्रांनो आपणाला माहीतच आहे की वर्ष न वर्ष आपण सगळे डिझेलवर चालणारी किंवा पेट्रोलवर चालणारी गाडीमध्ये सतत प्रवास केलेल्या आहेत त्यामुळे आपणास त्याची सवय लागून केलेली आहे आणि ह्या ईव्ही गाडीमध्ये आपणाला सवय नाही त्याचे मुख्य कारण दिलेले आहेत.
कारण काय?
1. EV गाड्या खूप शांत असतात – आवाज, कंपनं (vibration) फार कमी असतात.
2. रेजेनरेटिव्ह ब्रेकिंग – पाय गॅसवरून घेतल्यावरच गाडी आपोआप मंदावते, ब्रेक न दाबता.
3. झटक्याने वेग लागतो – EV मध्ये टॉर्क लगेच मिळतो, त्यामुळे गाडी पटकन जोरात जाते.
4. मेंदू गोंधळतो – आपल्या मेंदूला ICE गाड्यांचे आवाज, हालचाली सवयीचे असतात. पण EV मध्ये हे नसल्यामुळे शरीर आणि डोळ्यांना मिळणारे संकेत जुळत नाहीत, आणि त्यामुळे मळमळ होते.
जर हा सर्व तुम्हाला अनुभव येत असेल तर ह्याचा उपाय तुम्हाला मी या पोस्टमध्ये सांगायचं प्रयत्न करत आहे तरी हा उपाय ला एकदा तरी ट्राय करून पहा.
- गाडीचा “इको मोड” चालू करा –
- गाडी सौम्य चालते.
- रेजेनरेटिव्ह ब्रेक कमी करा.
- काही कंपन्या केबिनमध्ये लाइट्स बदलून मळमळ कमी करण्याचे प्रयोग करत आहेत.