ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग (22 ऑगस्ट) – एपिसोड अपडेट

प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 22 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात आजच्या भागामध्ये अर्जुनने अस्मिता आणि प्रतापरावां सोबत या सायलीसाठी प्लॅनिंग सुरू केली आहे कल्पनात ताई आणि सायली या दोघींनाही जवळ आणण्याच मिशन यांच चालू आहे आता या मिशन मध्ये प्रतिमा पण सहभागी होणार आहेत बरं का तर बघा आजच्या भागात काय झालंय प्रतापराव म्हणतात काय रे बाबा काय झालं अर्जुन घरातल्या घरात कशाला बोलवतोयस अस्मिता म्हणते हो ना काय झालं रे मग आता अर्जुन म्हणतो तो डॅड अस्मिता ताई तुम्हा दोघांशी मला बोलायच डॅड तुम्ही

सायलीशी खूप छान वागतायत आणि खूप सपोर्ट करताय तिला हे मला कळते आणि अस्मिताई तू पण चांगली वागतेस बर का माझ्या बायकोशी अस्मिता म्हणते अगदी तसंच काही नाहीये पण बाळाला त्रास नको ना या दिवसामध्ये चिडचिड केली तर त्रास होईल बाळाला म्हणून मी काही बोलत नाही मग अर्जुन म्हणतो तू एकदम ना मॉम सारखीच आहेस बघ अस्मिता ताई बोलत नाहीस मनातलं प्रेम बोलायला जायचं तर तुझा इगो समोर येतो अस्मिता म्हणते ए असं काही नाहीय इगो वगैरे पण हा आपली मम्मा अशी वागतीय खरं प्रतापराव म्हणतात हो ना रे अर्जुन मी पण तिला समजवायचा प्रयत्न करतोय

पण ती काही ऐकतच नाहीये रे कल्पनान ना विसरतच नाहीये मला वाटतं हा इगो नाही विश्वासघाताच दुःख आहे अर्जुन म्हणतो डॅड मला ना आता तेच मम्माला विसरायला लावायचं आणि सायली सोबत पुन्हा पहिल्यासारखं वागायला लावायच तिला अस्मिता म्हणते अर्जुन असं झालं ना तर घरातलं वातावरण छान आणि आनंदी होईल बघ पण मम्माच वागणं कसं बदलायचं डॅडने तर सगळे प्रयत्न केले आता काय करणार आहोत आपण अर्जुन म्हणतो आपण नाही तुम्ही दोघांनी मिळून करायचंय तुम्ही दोघांनी मिळून सायलीला टॉर्चर करायचं आता प्रतापरावांचा स्वभाव जरा मृदू आहे ते दोघेही टेन्शन मध्ये आलेत आता प्रतापराव

अस्मिता दोघेही सोबत म्हणतात काय करायचं अर्जुन म्हणतो तुम्ही दोघांनी ना सायलीला जरा टॉर्चर करायचा ओरडायचं सायलीला म्हणजे मम्माचं वागणं कसं आहे तसं म्हणजे बोलायचं पण मम्माला लागेल असं आणि सायलीला लागेल असं बोलायचं. प्रतापराव म्हणतात ए अर्जुन बाळा तुझी रात्रभर झोप झालेली नाहीये रे बाबा अरे तुझी झोप झाली नाही ना म्हणून तुला असे चित्र विचित्र विचार सुचताय बाबा तुला गरज आहे झोपेची तू झोप अर्जुन म्हणतो डॅड डॅड तसं काही नाहीये ऐका ना माझं अहो मी खूप विचार केलाय आणि मग या निर्णयावर पोहोचलोय खरंच आपल्याला हे सगळं नाटक

करायचंय तुम्हाला काही खरं खरं नाही वागायचंय मम्मा कशी वागत असली ना सायलीशी तरी चालतं पण दुसरं कोणी सायलीला त्रास देत असेल तर ते मम्माला सहन होणार नाही अजिबात मग मम्मा साहिलीकडे वळेल आणि तिच्याशी प्रेमाने वागेल त्यावर आता प्रतापराव म्हणतात प्रतापराव जरा विचार करतात आणि म्हणतात हे बघ अर्जुन तुझ्या बोलण्यात तसं तथ्य नाही तसं लॉजिक आहे तुझ्या बोलण्यामध्ये पण तुझ्या या प्लन मध्ये भलं मोठं भगदाड आहे बाबा तुझ्या आईसमोर जर मी अशी नाटक करायला लागलो ना तर तुझी आई मला लगेच पकडेल रे बाबा ह मला नाही वाटत हे सगळं शक्य आहे अर्जुन म्हणतो

असं काय करता डॅड प्रयत्न तर करा सगळं शक्य होईल त्यावर प्रतापराव म्हणतात नाही रे बाबा काही शक्य नाहीये तुला एक किस्सा सांगतो अरे आमचं लग्न झाल्यावर मी एकदा न सांगता मी तिला न सांगता एकदा पार्टीला गेलो होतो मित्रासोबत ती अजूनपर्यंत ऐकवते रे बाबा मला मला नाही वाटत मला हे नाटक करायला जमेल नाही छेछे नाही रे बाबा मला काही जमणार नाही हे नाटक वगैरे अस्मिता म्हणते अर्जुन डॅड ना सायलीवर जास्ती प्रेम करतात बर का माझ्यावरही करत नाही एवढं ते सायलीवर प्रेम करतात आणि ते हे नाटक काही करू शकणार नाही आणि मला नाही

वाटत खरच डॅडला हे जमेल प्रतापराव म्हणतात बाबा अर्जुन तुझी आयडिया चांगली आहे पण तू माणूस चुकीचा निवडला या नाटकासाठी ना मी कल्पनाशी खोट बोलू शकत ना मी सायलीला त्रास देऊ शकत अर्जुन आता टेन्शन मध्ये आला तो म्हणतो आता कोण टॉर्चर करणार सायलीला त्रास कोण देणार आता दोघे विचार करायला लागतात आणि त्या दोघांच्या नजरा अस्मिताकडे वळतात मुळातच अस्मिता आधी त्रास द्यायची ना सायलीला म्हणून आता अस्मिता म्हणते माझ्याकडे बघू नका मला नाही जमणार अशी नाटक बिटक अर्जुन म्हणतो अगं अस्मिता ताई तुला कुठे नाटक करायचंय जशी तू आधी वागत

होतीस ना म्हणजे नॉर्मल तसंच वागायचंय तुला तुला फक्त सायलीला थोडा थोडा त्रास द्यायचाय अगं ती काही करत असली ना तर त्यावर तुला टोमणे मारायचेत आणि सांगायचं की सायली कशी इरिटेटिंग मुलगी आहे कशी तुला त्रास देत असते एवढंच तर करायचं तुला पण आता बघा या अस्मितालाही जरा टेन्शन आल कारण आता तिचा स्वभाव बदललाय ना मूळ वागणं वेगळं आणि नाटक करणं वेगळं तर आता प्रियाचा सीन त्यांनी दाखवला आणि प्रेक्षकांनो काल जो डाऊट आला होता ना मला तो जरा खोटा ठरलाय म्हणजे प्रिया ड्रामाच करतीय बर का चक्कर आल्याच नाटकच तिने केलय डॉक्टर चेक करत असतात तिला जेलमध्ये आणि

त्या बाईला विचारतात कॉन्स्टेबल बाईला हिने काय खाल्लं हो काल शेवटचं काय खाल्लं होतं कॉन्स्टेबल सांगतात हिने काहीच खाल्लं नाहीये वरणबात खाल्ला होता परवा फक्त तिला ना जेलच जेवण आवडत नाही म्हणे आता तो अश्विन लगेच चिडतो आणि म्हणतो माझ्या बायकोने काही खाल्लं नाही आणि तुम्ही आता सांगताय अहो तिला अशक्तपणा आलाय चक्कर आली आहे तिची शुगर वाढली असेल तर त्या डॉक्टर म्हणतात ओ तुम्ही जरा शांत होता का त्यावर अश्विन म्हणतो असं कसं तुम्ही मला शांत राहायला सांगताय माझ्या बायकोला ताबडतोप ट्रीटमेंट मिळाली पाहिजे माझ्या बायकोला आत्ताच्या आत्ता

हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा कुठे कुठे तुमचे सीनियर डॉक्टर मला बोलायचं त्यांच्याशी आता ती कॉन्स्टेबल घाबरते बरं का अश्विन म्हणतो अहो काहीतरी करा ना माझ्या बायकोला हॉस्पिटलमध्ये न्यायची व्यवस्था करा आता त्या प्रियाला उठवत असतो तन्वी आहे मी पण प्रिया बेशुद्ध झाल्याच नाटक अजूनही कंटिन्यू ठेवतीय तर बघा पुन्हा पुढे अर्जुन आणि अस्मिताच सीन दाखवलाय आता हे अर्जुन आणि प्रतापराव म्हणत असतात अगं असं काय करतेस अस्मिताई अगं हीच वेळ आहे तुला हे वागायची योग्य वेळ आहे प्रतापराव म्हणता अस्मिता तुला काही वेगळं वागायचं

नाहीये तू आधी वागत होतीस तसच वाग ना त्यावर अस्मिता म्हणते डॅड मी तन्वीच्या सांगण्यावरन सायलीचा रागराग करत होते हो पण हे मला उशिरा कळलं पण ठीक आहे मम्माने जर सायलीला एक्सेप्ट केलं ना तर तन्वीसाठी ही खूप मोठी शिक्षा असेल सात वर्षाच्या तुरुंगवासापेक्षाही मोठी शिक्षा अर्जुन म्हणतो प्लीज अस्मिताई त्यासाठी आम्हाला जॉईन हो ना होशील ना जॉईन अस्मिता म्हणते मग तुम्ही दोघं माझ्या आजूबाजूला असाल ना अर्जुन म्हणतो हो एव्हरी टाईम आम्ही नेहमी तुझ्या आजूबाजूला असू मग आता अस्मिता म्हणते ठीक आहे तर मग बघते जमत की नाही

मला ते अर्जुन म्हणतो चला तर मग फॅटास्टिक आता प्रतापराव म्हणतात अरे मी काय म्हणतो आपण सायलीला पण आपल्या मिशन मध्ये सहभागी करून घेऊ ना म्हणजे अस्मिता तिला काही बोलली तर तिला वाईट नाही वाटणार ना म्हणजे तिला टेन्शन नको यायला त्यावर अर्जुन म्हणतो नको नको अहो डॅड आपण जर सायलीला सांगायला गेलो ना तर सायली आपल ऐकणारच नाही सायली आधीच म्हणेल नको मग मला वाईट वाटेल असं अस करू नका त्यांना त्रास होईल जर सायलीला काहीच माहित नसेल तर तिला जो त्रास होतोय ना तो मम्माला ऑथेंटिक वाटेल आता प्रतापराव म्हणतात हे तुझं बरोबर आहे

अर्जुन म्हणतो ठरलं तर मग आता मिशन मम्मा तिघे जण आता एकमेकांच्या हातात हात देतात बर का अस्मिता म्हणते ठरलं तर मग आता मी मैदानात लढणार आणि तुम्ही दोघांनी मला साथ द्यायची बाहेरून अर्जुन म्हणतो चालेल मग आता प्रतापराव म्हणतात मिशन कल्पना आता आपल्याला खरी आणि प्रेमळ कल्पना समोर आणायची आहे आता हे तिघेचे तिघे असे हातात हात देतात ना ठरलं तर मग करून तेवढ्यात तिथे सायली येते बर का सायलीला पाहून आधी प्रतापरावांनाच टेन्शन येतं सायली म्हणते अरे वा तुम्ही तिघे जण काय करताय हे असे हातात हात का देताय सायली या तिघांकडे बघत

असते आता यांना समजत नाही काय सांगावं सायलीला कारण सायली पासन हा प्लॅन लपवायचा आहे ना अर्जुन म्हणतो गेम गेम खेळतो आहे आम्ही ते लहानपणी आम्ही असाच गेम खेळायचो एक सायली म्हणते म्हणते अरे वा मला पण घ्या ना तुमच्या या गेममध्ये मी पण खेळेल आता लगेच अस्मिता म्हणते काय ग सायली तुला सगळ्यातच नाक खुपसायचं असतं का? आमच्या लहानपणीच्या गेममध्ये तुझं काय ग काम नाही आम्ही नाही घेणार तुला गेममध्ये पण शी बाबा मला नाही खेळायचं आता गेम मी चालल इथून आता सायलीला काही समजे ना काय चाललं यांचं सायली म्हणते अरे देवा अस्मित ताई

का गेल्या मी काही चुकीचं बोलले का हो आता अस्मिता जाते पण जाता जाता आता दारात तून जस अर्जुनला थम्स अप करते सायली आता दाराकडे बघायला लागते तेव्हा लगेच अस्मिता चालली जाते तिथून छान आणि मजेशीर दाखवला त्यांनी आजचा भाग आता ही सायली म्हणते काय झालं तुम्ही दोघं असे का बघताय दाराकडे काय झालं काय अर्जुन म्हणतो अरे काय नाही झालं अग तू अस्मिताईकडे लक्ष देऊ नकोस बायको अस्मिताई अशीच आहे अशीच वागत असते ती आता पुन्हा अस्मिता येते आणि दारातून खुणवते या अर्जुनला चल मी चालले आता तू कं कंटिन्यू कर आणि मग सायली म्हणते काय हो

काय झालंय काय झालंय का? आता अर्जुन म्हणतो अगं बायको तू इथे कपडे ठेवायला आली होतीस ना आणि इकडे आण मी सगळे कपडे ठेवतो अर्जुन तो कपड्याचा गट्टा त्याच्या हातात घेतो आणि म्हणतो जा ना बायको तू खाली मम्मा ओरडेल तुला जा तुझे काम आहेत ना जा खाली मी करतो हे सगळं सायलीला काही कळे ना पण आता तरी ती खाली निघून जाते मग आता सायली गेल्यावर प्रतापराव म्हणतात बाबा अर्जुन हे नाटक बिटक काही जमणार नाही रे बाबा आपल्याला तू किती ओऍक्टिंग करतो रे अशी नाटक केले तर लगेच पकडले जाऊ आपण आणि सायलीला संशय पण आला बघ आत्ताच नाही रे

बाबा नाही आता आपल्याला काही हे जमणार नाही वाटतं सायलीला बघ कसा संशय आलाय आपण नाटक करतोय म्हणून मला वाटतं आपल्याला आता कुमक मागवावीच लागेल अर्जुनला काही कळलं नाही कुमक म्हणजे काय खरंतर मला पण कळलं प्रेक्षकांनो प्रतापराव म्हणतात अरे कुमक म्हणजे सैन्य आपण युद्ध करतोय ना मग आपल्याला सैन्य नको का म्हणजे अस्मिता रागराग करते सायलीचा मग कल्पनाकडे ढकलायला कोणीतरी नको का सायलीला ढकलायला कोणीतरी पाहिजे ना आता अर्जुन म्हणतो हा पण हे कुमक कुठून आणायचं प्रतापराव म्हणतात अरे प्रतिमा प्रतिमाला आपण आपल्या प्लन मध्ये

सहभागी करू आणि ती कल्पनाला बरोबर सायलीकडे वळवेल काय म्हणतोस अर्जुन म्हणतो फॅटस्टिक आयडिया डॅड मी लगेच आत्याला फोन करतो आणि अर्जुनने फोन लावलाय प्रतिमा आत्याला आणि म्हणतोय ए अगं प्रतिमा आत्या, अ मम्मा बरी आहे, सायली पण बरी आहे. पण आम्हाला ना एक प्लॅन करायचा आणि तुझी मदत हवी आहे आणि आता तो प्लॅन त्याने बहुतेक समजून सांगितला असावा पण ते आपल्याला दाखवलं नाहीये पुन्हा प्रियाचा दाखवला बर का सीन आता प्रिया उठून बसली आहे बर का आणि नाटक करतीय आणि म्हणते अश्विन अश्विन माझ्यात त्राण नाहीये रे मला फार चक्कर

येतीय रे आता अश्विन म्हणतो मी आहे हा मी आहे तुझ्यासोबत आणि मग अश्विन त्या पोलिसांवर आणि त्या कॉन्स्टेबलवर ओरडतो आणि म्हणतो तुम्ही तोंड का बघताय माझं मघापासन सांगतोय ना माझ्या बायकोला त्रास होतोय पटकन तिला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा. प्रिया आता लग्गी जाती की काय असं तिचा अविर्भाव आहे बर का अश्विन म्हणत असतो माझ्या बायकोला काही झालं तर त्यावर आता तिथे बहुतेक ते कोणीतरी अधिकारी आहेत पोलीस अधिकारी ते म्हणतात हे बघा कुठल्याही कैद्याला आम्ही ट्रीटमेंट देतो पण त्याच्यान काही प्रोसिजर असतात आम्हाला यांना असं डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट

नाही करता येणार मग आता अश्विन म्हणतो तुमच्या प्रोसिजर पाई जीव जाईल माझ्या बायकोचा साक्षी म्हणते काही जीव जाणार नाही रे तुझ्या बायकोचा स्वतःच बीपी लो कसं होईल ना हे तिने बरोबर पाहिलय काय नाही नाटक चालली आहेत सगळी जेलच्या बाहेर पडायची त्यावर अश्विन म्हणतो जस्ट शट यर माऊथ अश्विन तिला म्हणतो तुझा काही संबंध नाहीय इथे तुझं तोंड बंद ठेव साक्षी साक्षी म्हणते कसा संबंध नाहीये कसा संबंध नाहीये माझा या प्रियामुळे माझ्या आयुष्याचा सत्यानाश झालाय हिच्या बाबतीत जे जे घडल ना ते ते सगळं माझ्याशी संबंधित असणारच आहे चलगा चल उठ काही नाटक करू नको

चार घास खाय आणि चल गोळ्या घे आणि बरं वाटेल तिला हो डॉक्टर गोळ्या देऊन टाका हिला कमाल ना प्रेक्षकांनो ती साक्षी एवढं बोलतीय तरी पण अश्विनला काही जाग येई ना असो आता इकडे या प्रतिमा आत्या आल्यात आणि यांचा प्लॅन आता सुरू झालाय आता पहिल्याच प्रयत्नात फसतात की काय ते बघा काय होत प्रतिमा आत्या आल्यात सुभेदारांच्या घरी अर्जुन म्हणतो अरे वा आत्या आलीस कशी काय आलीस सायली खुश होते आणि म्हणते अरे वा प्रतिमा आत्या बसा ना मी एवढी ताट ठेवून आलेस आता हे प्रतापराव आणि अर्जुन हळूहळू बोलतात बरं का प्रतिमा आत्याला प्रतापराव

म्हणतात अरे अर्जुनचा फोन आला ना प्रतिमा तुला कळलं ना तुला ला काय करायचंय? प्रतिमा म्हणता हो कळलं पण त्या सायलीला जास्ती त्रास नका देऊ बर का? आता अर्जुन म्हणतो नाही होणार त्रास तू फक्त आमच्याकडन लढ आता बघा कल्पनात ताई आल्यावर ही अस्मिता जोरात टेबलवर ग्लास वाजवते मग आता अर्जुन आणि प्रतापराव बघतात अस्मिताकडे मग अस्मिता कुणवते त्यांना आई आली मम्मा आली आणि मग मुद्दाम ओरडते मोठ्याने सायली किती वेळेची सांगते तुला ड्रायफ्रूटचे लाडू पाहिजे ड्रायफ्रूटचे लाडू पाहिजे तू काही बनवे ना एका वाटीत ड्राय फ्रूट तरी आणून ठेव माझ्यासमोर किती

कंटाळ येतो का तुला काम करायचा सायलीला काही समजे ना अचानक अस्मिताला काय झालं कल्पनात ताई खाली आल्यात आता जिन्याहून मग आता अस्मिता म्हणते मम्मा या घरात माझे डोळे डोहाळे पुरवले जाणार की नाही माझे लाड करणार आहे की नाही कोणी त्यावर कल्पनाताई म्हणतात अग अस्मिता या घरात तुझेच लाड होतात अस्मिताला पुढे आता बोलता येई ना काही काय बोलावं काही कळेना सायली म्हणते अहो अस्मिता ताई अहो मला खरंच माहिती नव्हतं तुम्हाला ड्रायफ्रूटचे लाडू हवेत मी बनवून ठेवले असते आता अस्मिताला समजेन काय बोलावं काय बोलावं अर्जुन तिकडून खुणवत असतो काहीतरी बोल काहीतरी

बोल मग अस्मिता उभी राहते आणि म्हणते किती खोटारडी आहेस ग कालच मी तुला म्हणले होते की ड्रायफ्रूटचे लाडू बनव तू म्हणाली होती मला बनवून देईल आणि आता विसरली का मुद्दाम करते तू सायली आता सगळेजण पाहायला लागतात अस्मिताकडे मग सायली म्हणते नाही हो अस्मिता ताई आपल या विषयावर बोलणच नाही झालं हरकत नाही मी करून देते हो लाडू तुम्हाला आणखीन काही हवय का तुम्हाला सायली असं बोलल्यावर आता अस्मिता म्हणते तुझे उपकार नकोय मला मला माहिती आहे तू खोट खोट वागते सगळ्यांसमोर गोड गोड बोलते माझे डोहाळे पुरवले पुरवतीयस असं दाखवते

सगळ्यांची पाठ फिरली की मग दुर्लक्ष करते माझ्याकडे तू सायली म्हणते नाही हो अस्मिता ताई मी असं कशाला सायली म्हणते असं का बरं बोलताय अस्मिता ताई तुम्ही मला अस्मिता म्हणते कारण ना तू हे सगळं मुद्दाम करतेस म्हणजे असं दाखवते सगळ्यांसमोर की खूपच माझ्यावर प्रेम करते वगैरे पण सगळ ंची पाठ पिडली की राग राग करतेस माझा कल्पना ताईंना आता राग येतोय बर का अस्मिताचा पण आता ती घरवारशी असल्यामुळे त्यांना काही बोलता येई ना सायली म्हणते अस्मिता ताई असं का हो वागेल मी तुमच्याशी मग लगेच अस्मिता म्हणते कारण तुला सगळ्यांसमोर दाखवायचं असत ना तू खूप

चांगली आहे आणि मी वाईट आहे सायली म्हणते नाही हो असं नाही हो अस्मिता ताई तुम्ही असं का वागताय आश्रमात आल्या होत्या तेव्हा तर तुम्ही अस्मिता म्हणते ए आश्रमाचा विषय नको काढूस मी तिथे आले म्हणजे तुझ्या सगळ्या चुका माफ केल्या असं होतं का नाही कल्पना ताई आता चिडतात बर का आणि म्हणतात हे अस्मिता काय चाललंय तुझं तुला सांगितलं ना चिडचिड नाही करायची आता अस्मिता चुप्प बसते बर का मग लगेच अर्जुन सुरू होतो अगं मम्मा अस्मिताईच असच आहे माझी बायको दिसली की सुरू होते काय ग अस्मिता ताई तुला रागराग येतो ना एवढा माझ्या बायकोचा मग कशाला सांगतेस ग तिला

लाडू बनवायला काही नको बनवस बायको अस्मित ताई साठी लाडू लगेच आता प्रतापराव म्हणतात ए अर्जुन एरवी मी काही बोलत नाही पण आता माझ्या पोरीला काही बोलायचं नाही या दिवसांमध्ये तिला या दिवसात त्रास दिलेला मला चालणार नाहीये. आता अस्मिता लगेच नाटक करायला लागते बघा बघा माझे वडील माझ्याकडून आहे मग आता पुन्हा एकदा साक्षी आणि या जेलचा सीन त्यांनी दाखवलाय अर्जुन आणि प्रतापराव यांचं नाटक जरा रंगात आलय आता इकडे बघा जेलमध्ये काय झालंय ते डॉक्टर म्हणतात आम्ही कसं वागायचं हे तुम्ही ठरवू नका अश्विनला ते ओरडत असतात साक्षी म्हणत असते अरे पण तुम्ही कसं

वागायचं हे ही प्रिया ठरवते ते कळत नाहीये का तुम्हाला तुम्हा सगळ्यांना मॅनिपुलेट करते ही प्रिया या त्यावर अश्विन चिडतो आणि म्हणतो ए साक्षी मॅनपुलेट तू करतीयस तन्वीवरचा राग काढतीयस तू डॉक्टरांनी सांगितलय मलाही दिसतय की तन्वीला बरं नाहीये मी मगासपासन सांगतोय सगळ्यांना की आधी माझ्या बायकोला शिफ्ट करा हॉस्पिटलमध्ये तुम्ही सगळे माझं ऐकत का नाहीये माझ्या बायकोला जर काही झालं ना तर ही गोष्ट मी वरपर्यंत घेऊन जाणार सांगून ठेवतोय तुमच्या जेलमध्ये कसं वागवलं जातं कैद्यांना कसं ट्रीट केलं जातं ही सगळी गोष्ट मी मीडियापर्यंत घेऊन जाईल साक्षी

पाहतच राहते बरं का अश्विन कडे तिला लक्षात येते की हा किती येडा आहे पुन्हा तो म्हणतो अश्विन याद राखा मी हे सगळं मीडियात नेलं पटकन तिला ऍडमिट करा तिच बीपी लो झालय मग आता ते डॉक्टर सांगतात की हो हिच बीपी लो झालय हिला हॉस्पिटलाईज करा प्लीज आता हा प्रियाच्या प्लॅनचा एक हिस्सा आहे बरं का प्रेक्षकांनो आता ते लगेच पोलीस म्हणतात ठीक आहे आम्ही प्रोसिजरला सुरुवात करतो आता प्रियाची पहिली पायरी पार झाली आहे आता ती सध्या तरी हॉस्पिटलच्या निमित्ताने बाहेर पडणार आहे पण आता पुढे तिचे काय काय नाटक पाहावे लागणार ते बघू आता कशी बघते बघा सायलीकडे

आता सुभेदारांच्या घरचे हे नाटक जरा विकोपाला चाललय प्रतापराव म्हणतात काय ग सायली अस्मिताने तुला लाडू बनवायला सांगितले होते ना ते बोलायचं सोडून तू वाद घालतेस अस्मिता सोबत सायली म्हणते वाद त्यावर प्रतापराव म्हणतात मग काय वाद नाही तर काय हा वादच झाला ना हे बघ मी नेहमी घेतो हा तुझी बाजू पण तुला निषून सांगतोय सायली अस्मिताच्या बाबतीत हलगर्जीपणा करायचा नाही मला ते चालणार नाही बर का अजिबात मग सायली म्हणते नाही हो बाबा अहो कोणाची शपथ घेऊन सांगू मला माहिती नव्हतं अस्मिता ताईना ड्रायफ्रूटचे लाडू हवेत आणि खरच मी बनवले असते हो बाबा सायली आता थेट

रडायला लागते बर का अर्जुन खुणवतो प्रतापरावांना डॅड आता काहीतरी बोला ना पुढे मग लगेच प्रतापराव म्हणतात अरे तू पुन्हा वात घालतेस सायली तुझ्यामुळे माझ्या गरोदर लेकीची चिडचिड होते आणि तू माझ्याशी वात घालतेस त्यावर वर आता या सायलीच तोंड एकदम बारीक होऊन जात बर का कल्पनाताई पाहतच राहतात या सगळ्यांकडे आता या प्रतिमात्यामध्ये पडतात त्यानंतर प्रताप पुरे करा आता हा विषय बस बरं संपवा विषय बस करा आता सायली बाई तिला लाडू बनवून दे बरं आणि ती म्हणते ना मी बनवून देईल लाडू बनव ग बाई सायली लाडू बनव सायली म्हणते हो प्रतिमा आत्या मी बनवेल लाडू

लगेच अस्मिता म्हणते मला नको आता लाडू गेला माझा मूड आता सायलीला तो घालवायचाच होता माझा मूड म्हणून केलं सायलीने कल्पनाताई पाहतच राहतात अस्मिताकडे आता लगेच अस्मिता म्हणते थँक्यू सायली बाळाकडून पण थँक्यू उगाचच इमोशनल ब्लॅकमेलिंग चालू आहे बर का प्रेक्षकांनो पण मजा येते बघायला सायली लगे रडायला लागते अहो थांबा हो अस्मिता ताई मी करते हो लाडू लगेच आता अस्मिता चालली जाते तिथून आता लगेच प्रतापराव म्हणतात सायली परत सांगतो मला तुझ्यामुळे अस्मिताच्या डोळ्यात पाणी आलेल चालणार नाही सायली म्हणते असं काय करता बाबा अहो मी खरच असं

करेल का हो तुम्हाला असं कसं वाटतय मी अस्मिता ताईंकडे दुर्लक्ष करेल का अहो कदाचित सांगितलं असेल मला अस्मिता ताईंनी लाडू बद्दल पण माझं लक्ष नसेल हो बाबा अहो कदाचित मी मधुभाऊंच्या विचारात असेल सायलीच्या डोळ्यात आता पाणी आलं बर का आता कल्पना ताईला ते सहन होई ना मग सायली म्हणत असते बाबा समजून घ्या ना हो मला अहो तुम्ही असं वागू नका ना हो माझ्याशी मला नाही सहन होणार बाबा आता प्रतापरावा टेन्शन आलय बर का प्रेक्षकांनो आता ते जर जरा गडबडतात आणि म्हणतात ठीक आहे ठीक आहे जर मी असं तुझ्याकडून बोलायला हवं असेल ना

तर असं वागू नकोस पुन्हा अस्मिताशी आता प्रतापरावांना पुढचा काही डायलॉग आठवेना लगेच सायली गळागळा रडायला लागते आणि हे सगळं वातावरण अचानक सिरियस होऊन जातं आता पहा प्रतापराव निघून जातात कल्पना तिथेच उभी आहे आणि या प्रतिमा त्या सायलीच्या असं पाठीवरून हात फिरवत आहे बाई रडू नको रडू नको आणि अर्जुन कडे त्या बघतात अर्जुन आता विचार करतो मनात बायको हा त्रास थोडे दिवस सहन कर कारण आता हा त्रास संपल्यावर पुढे तुझ्या आयुष्यात आनंदच आनंद आहे आणि प्रेक्षकांनो हा एपिसोड इथे संपलाय तसं बघायला गेलं तर आजचा एपिसोड खूप लहान

दाखवलाय त्यांनी आता या अर्जुन आणि प्रतापरावांच नाटक पुढच्या अंकाला पोहोचलाय आता अस्मिता जेवताना तमाशा करते मला नाही जेवायचं तुझं तोंड बघत नाही मी माझ्या रूममध्ये जाऊन जेवते मी आता लगेच प्रतापराव म्हणतात उठवलं माझ्या पोरीला जेवता जेवता अर्जुन म्हणतो मला पण जेवायचं नाही मग सायली खूप टेन्शन मध्ये येते आणि म्हणते थांबा थांबा माझी शपथ आहे तुम्हाला कोणीही असं उठू नका जेऊन जेवताना तुम्ही जर जेवले नाही ना तर मी तीन दिवस अन्न पाण्याचा त्याग करीन आता बघा ह प्रेक्षकांनो सगळेजण गेल्यावर या कल्पनाताई सायलीच ताट वाढतात मग प्रतिमा

विचारते काय ग कोणाचं ताट वाढतेस कल्पना कल्पनात ताई म्हणतात हिचं ताट वाढते मी हिच्या बाबतीत अस्मिताचं काहीही चुकलेलं नाहीये आणि मला नाही वाटत हिचं काही चुकलंय ही उगाच शिक्षा का भोगायची आणि त्या तिला जेऊन घे असं म्हणतात मग प्रतिमात्या समजवतात बघ सायली तुझी सासू तुझी बाजू घेते बर का आणि आता जे अर्जुन नाटक करतोय ते वर्क होतय हे दिसतय प्रेक्षकांनो आता मालिकेच नवीन प्रोमो आलाय आता येत्या 28 ऑगस्टला सायलीला काहीतरी दुसरस आठवणार आहे तिच्या लहानपणीच आता अर्जुनला त्यामुळे हिंट मिळेल का सायली खरी तन्वी आहे याची बघूयात

पुढे काय काय घडतय कस आहे ना प्रेक्षकांनो पूर्णाजी गेल्यामुळे खूप मोठा लॉस झालाय त्यातन आता सणवार आलेत त्यामुळे मालिकेची कथा थोडीशी शी स्लो जाणारच अपेक्षितच आहे आपल्या सगळ्यांना पण बघूयात काय काय घडतय पुढे मंडळी बघता बघता बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली की हो आता बाप्पा येणार आहे तुमच्याकडे झाली की नाही बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आमच्याकडे सुरुवात केली आहे बर का कालपासन मी माझ्या मैत्रिणींची तयारी कुठवर आली आहे मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि प्रेक्षकांनो आज पोळा आहे तुम्हाला आजच्या बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा भेटूयात

उद्या पुन्हा एकदा ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ू सहित तोपर्यंत टेक केअर मंडळी धन्यवाद

Spread the love

Leave a Comment