नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.
येत्या 30 जुलैला या मालिकेच्या आश्रम केसचा निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे 30 जुलै नंतर ही मालिका संपणार का असा गैरसमज अनेक प्रेक्षकांमध्ये निर्माण झाला आहे आणि प्रेक्षकांचा हाच गैरसमज दूर करण्यासाठी आता अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशाली यांने स्वतः एक व्हिडिओ शेअर करत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
या व्हिडिओमध्ये अर्जुन म्हणताना दिसतोय. नमस्कार मी अमित भानुशाली आणि आज मी तुम्हाला इथे हेसांगायला आलोय की बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत की आता कोर्ट केस संपणार आहे म्हणून ही मालिका ही संपणार का
तर असं अजिबात नाहीये हा शो संपणार नाहीये फक्त मधुभाऊंची जी केस आहे ती संपते अडीच पावणे तीन वर्ष लागली ही कोर्ट केस संपायला पण यानंतरही अजून बरच काही बाकी आहे खरी तन्वी कोण आहे सायलीच खरी तन्वी आहे का तसेच नागराज आणि महिपत यांच्या सुद्धा केसेस आहेत
त्यामुळे हा शो संपणार नाहीये या शोवर तुमचं इतकं प्रेम आहे की हा शो कधीच संपणार नाहीये त्यामुळे ठरलं तर मग मालिका नेहमी पाहत रहा असे अर्जुन या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे
एकांदरीतचकोर्ट केस संपल्यानंतर मालिका संपणार का असा प्रेक्षकांमध्ये एक गैरसमज निर्माण झाला होता मात्र ही मालिका संपणार नसल्याचं अर्जुनने स्वतः व्हिडिओ शेअर करतच सांगितल आहे तर
ठरलं तर मग मालिका तुम्ही पाहता का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद